शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित तरुणाच्या आत्महत्येने समाजमन सुन्न

By admin | Updated: March 17, 2017 02:46 IST

बालपणी मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. मुलगा शिकून मोठा होईल, नोकरीला लागेल

शेलूची घटना : ज्ञानेश्वर झाला होता बी.टेक. प्रकाश लामणे  पुसद बालपणी मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. मुलगा शिकून मोठा होईल, नोकरीला लागेल आणि कुटुंबाला चांगले दिवस येतील, असा भक्कम आशावाद, पण नियतीच्या मनात काही वेगळेच. बीटेक झालेल्या उच्चशिक्षित तरुणाने काही कळायच्या आत आपली जीवनयात्रा संपविली. अपंग वडिलांचा आधार आणि आईची आशाच संपली. या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले. ज्ञानेश्वर विठ्ठल मस्के (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. पुसद तालुक्यातील शेलू बु. या लहानशा गावात तो राहात होता. लहानपणापासूनच शिक्षणात हुशार. पोटाला चिमटा देवून आई-वडिलांनी त्याला शिकविले. ज्ञानेश्वरने इयत्ता दहावीत व बारावीत ७० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविले. पुसदच्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातून त्याने बीटेक केले. चार वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण करून सध्या तो बारामतीत एका खासगी कंपनीत नोकरीला होता. ज्ञानेश्वरच्या घरची परिस्थिती जेमतेम. वडील विठ्ठलरावच्या नावावर कोरडवाहू एक एकर जमीन. त्यातच ते अर्धांगवायूने पीडित. आईने मोलमजुरी करून या चाणाक्ष्य बुद्धीच्या ज्ञानेश्वरला कमी पडू दिले नाही. मुलानेही नाव कमावले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. ज्ञानेश्वर महिन्या-दोन महिन्याने गावी आई-वडिलांच्या काळजीने येत होता. यावेळीही तो ९ मार्चला शेलूला आला. होळी आणि रंगपंचमी झाल्यानंतर बारामतीला जाणार होता. आई-वडील ज्ञानेश्वरच्या येण्याने सुखावले होते. कारण तोच त्यांच्या म्हातारपणाचा आधार होता. मात्र १५ मार्च रोजी दुपारी २ वाजता काळाने डाव साधला. आई रुक्मिणीबाई शेतात कामाला गेली होती. वडील विठ्ठल अपंग असल्याने ते घराच्या ओसरीत बसून होते, तर ज्ञानेश्वर एकटाच घरात टीव्ही पाहात होता. काही कळायच्या आत ज्ञानेश्वरने कंबरपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेतला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. हुशार व चाणाक्ष्य बुद्धीच्या ज्ञानेश्वरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अनुत्तरितच आहे. पोलीस या कारणांचा शोध घेत आहेत. शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रूंचा पूर दाटला होता. जगण्याचा आधार गेला एकुलता एक ज्ञानेश्वर आम्हाला सोडून गेला. आता आम्ही कोणासाठी जगावं, असा टाहो त्याची आई रुक्मिणीबाई फोडते तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. रुक्मिणीबाई केवळ ज्ञानेश्वर...ज्ञानेश्वर... म्हणून हंबरडा फोडत आहे. आमच्या जगण्याचा आधारच गेला, असे म्हणत ती अश्रूंना वाट मोकळी करते.