शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरातील ऊस अद्यापही उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:58 IST

जिल्ह्याचा शुगर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद आणि उमरखेड उपविभागातील हजारो हेक्टरवरील ऊस आजही शेतात उभा आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने खासगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देगाळपाची प्रतीक्षा : ऊस वाळत असल्याने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : जिल्ह्याचा शुगर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद आणि उमरखेड उपविभागातील हजारो हेक्टरवरील ऊस आजही शेतात उभा आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने खासगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतातील ऊस पाण्याअभावी वाळत असल्याचे चित्र आहे.उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना आणि महागाव तालुक्यातील गुंज येथे सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आली. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली. गुंज येथील साखर कारखाना अवसायनात जाऊन खासगी व्यवस्थापनाच्या घशात गेला. तर पोफाळी येथील साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून यंदा तर अद्यापही गाळपाला प्रारंभ झाला नाही. परिणामी या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. महागाव, पुसद, उमरखेड या तीन तालुक्यात शेतकऱ्यांचा ऊस आजही मोठ्या प्रमाणात शेतात उभा आहे. अनेक शेतकऱ्यांचाच तर नोंदणी केलेला ऊसही कारखाने तोडायला तयार नाही. शेतकरी कारखान्याचे उंबरठे झिजवित आहे. परंतु त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. शेतात उभा असलेला ऊस वाळत असल्याने शेतकºयांची चिंता वाढत आहे. गतवर्षीपर्यंत साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा दिसत होती. उसाची पळवापळवी सुरू होती. परंतु यंदा साखर कारखान्यात स्पर्धाच दिसत नाही. शेतकरी ऊस घेऊन जा असे सांगत असतानाही कारखाने टोळ्या पाठवायला तयार नाही. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस जाळण्याचा निर्णय घेतला आहे. डोळ्यात अश्रू आणून शेतकरी आपला ऊस जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.साखर आयुक्तांकडून पुढाकाराची गरजमहागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील अधिक रिकव्हरी देणाऱ्या उसाला साखर कारखाने पसंती देत आहे. गुंज येथील नॅचरल शुगर रिकव्हरी देणारी ऊसच उचलत असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. साखर आयुक्तांनी स्वत:हून पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्याची गरज आहे.