शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील ऊस शेतातच उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:00 IST

वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकºयांवर येणार आहे.

ठळक मुद्देऊस उत्पादक संकटात : वसंत कारखाना बंद असण्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. तर काही ठिकाणी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.उमरखेड तालुक्याची कामधेनू असलेला साखर कारखाना यंदा बंद पडला आहे. संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. परिणामी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. सुरुवातीला वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होणार या आशेवर परिसरातील शेतकरी निर्धास्त होता. परंतु कारखाना अचानक बंद पडला. शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. आता जानेवारी उजाडला. परंतु ऊस जाण्याची चिन्हे नाही. गतवर्षीपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे फिरणारे कारखाने आता मात्र फिरकूनही पाहात नाही. आलेले कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. ऊसतोडणीसाठी बसविलेल्या टोळ्या शेतकऱ्यांकडून एकरी पाच हजार रुपयांची मागणी करतात.या परिसरातील ऊस उत्पादकांच्या नोंदी वसंतला होत्या. त्यामुळे त्यांचा ऊस योग्य वेळेवर नेला जायचा. पंरतु आता त्यांचा ऊस तोडण्यासाठी कुणीही तयार नाही. परिणामी शेतकरी भांबावून गेला आहे. ऊस जर तोडला नाही तर शेतकºयांना तो जाळावा लागणार आहे. यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी आहे.कारखाना सुरू होण्याची चिन्हे नाहीवसंत सहकारी साखर कारखाना गत काही वर्षांपासून आर्थिक डबघाईस आला होता. गतवर्षी निच्चांकी गाळप करून कारखान्याचा पट्टा पडला. यावर्षी तर कारखाना सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा कारखाना सत्ताधारी भाजपाने आपल्या ताब्यात घेतला. सहकार क्षेत्रातील दिग्गज कारखान्याच्या अध्यक्षस्थानी बसविले. परंतु मंत्रालयापर्यंत प्रयत्न करूनही हा कारखाना सुरू झाला नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांसोबतच कामगारांचेही हाल होत आहे.