शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष निवडीसाठी सर्वपक्षीय बैठक

By admin | Updated: June 9, 2017 01:38 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रभारी अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारुन काँग्रेस,

जिल्हा बँक : पक्षीय अभिनिवेश बाजूला, नेते आले एकत्र लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रभारी अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारुन काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाचे नेते एकत्र आले. या सर्वांनी प्रभारी अध्यक्षपदासाठी विविध संचालकांच्या नावांची चाचपणी केली. येथील विश्रामगृहात गुरुवारी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री मदन येरावार, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री व विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांच्यासह २२ संचालकांची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष मनीष पाटील यांच्या राजीनाम्यानंतर उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. यानंतर उपस्थित संचालकांमधून नेमके कुणाला अध्यक्ष करायचे यावर विचारमंथन करण्यात आले. मनीष पाटील यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणणाऱ्या २२ संचालकांमध्ये अनेक संचालक अध्यक्षपदासाठी उत्सुक आहे. त्यांनी आपआपल्या गॉडफादरकडे अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. यातून सर्वपक्षीय नेत्यांना एका नावावर शिक्कामोर्तब करताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. भाजपाच्या पठडीतील संचालकाला अध्यक्षपदी बसविण्यासाठी पालकमंत्री येरावार जोर लावून आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मातब्बर संचालकांनाही अध्यक्षपदाची उत्सुकता लागली आहे. या सर्वांमधून नेमके कोण अध्यक्षपदी विराजमान होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वृत्तलिहिस्तोवर बैठक सुरू होती. त्यात कोणताही निर्णय झाला नाही.