शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

दोन दिवसात हिशेब सादर करा अन्यथा निलंबन

By admin | Updated: June 10, 2015 02:30 IST

खिशात टाकलेला शासनाचा लाखो रुपयांचा निधी दोन दिवसात तिजोरीत जमा करा अन्यथा निलंबन कारवाई केली जाईल, ...

यवतमाळ : खिशात टाकलेला शासनाचा लाखो रुपयांचा निधी दोन दिवसात तिजोरीत जमा करा अन्यथा निलंबन कारवाई केली जाईल, अशी तंबी अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सरदार यांनी जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे.‘कृषी विभागात एक कोटींच्या निधीची अफरातफर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत सरदार यांनी सोमवारी पुसद येथे कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शासकीय निधी खिशात टाकणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली गेली. तालुका स्तरावरील निधीचा व योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची जबाबदारी तुमची असताना तुम्ही त्याकडे दुर्लक्ष का केले, असा जाब गायकवाड यांना विचारण्यात आला. उमरखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात १५ ते २० लाखांची अफरातफर पुढे आली. ५० टक्के अनुदानावरील शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ दिला गेला. परंतु शेतकऱ्यांनी त्यापोटी भरलेली ५० टक्के रक्कम कृषी अधिकाऱ्यांनी पुरवठादाराकडे जमा न करता आपल्या खिशात ठेवली. अप्रत्यक्षपणे या रकमेचा अपहार केला. पुरवठादारांनी केलेल्या आॅडिटमध्ये एकट्या उमरखेड तालुक्यात ही अफरातफर १५ ते २० लाखांची आणि संपूर्ण जिल्ह्यात एक कोटींवर असल्याचे निष्पन्न झाले. म्हणूनच उमरखेडच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना दोन दिवसात या रकमेचा हिशेब सादर करा अन्यथा निलंबनाचा आदेश पाठविला जाईल, अशी तंबी कृषी सहसंचालक सरदार यांनी दिली. जिल्ह्यातील अन्य तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही रक्कम भरण्याबाबत समज देण्यात आली. अनेक कृषी कर्मचाऱ्यांनी सन २००९-१० पासून ही रक्कम शासनाच्या तिजोरीत न भरता अथवा साहित्य पुरवठादार मंडळांकडे जमा न करता स्वत:च परस्पर खर्च केली होती. त्याचा गाजावाजा झाल्यानंतर आता कृषी कर्मचाऱ्यांनी निलंबन व फौजदारी कारवाईतून वाचण्यासाठी या रकमेची जुळवाजुळव सुरू केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)