शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘वायपीएस’मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव

By admin | Updated: July 13, 2017 00:14 IST

सीबीएसई दहावीच्या परीक्षेत टॉपर राहिलेल्या यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेत पार पडला.

 विद्यार्थ्यांचे मनोगत : वेळेचे नियोजन आणि अभ्यासातील सातत्य लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सीबीएसई दहावीच्या परीक्षेत टॉपर राहिलेल्या यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेत पार पडला. विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना यशाचे गुपित सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून अँग्लो हिंदी हायस्कूलचे प्राचार्य मदनलाल कश्यप, माजी प्राचार्य शंकरराव सांगळे, वायपीएसचे प्राचार्य जेकब दास उपस्थित होते. अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही मंचावर उपस्थिती होती. विदर्भातून प्रथम टॉपर नुपूर अग्रवाल व प्रणव काबरा (९९.०४ टक्के), द्वितीय टॉपर गौरी पांडे (९९.०२ टक्के), तृतीय टॉपर आशय इंदूरकर (९९ टक्के) यांनी यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वायपीएसच्या ४२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण घेतले. हिंदी विषयात दोन, संस्कृतमध्ये दहा, गणित विषयात सात, तर एसएसटीमध्ये सहा विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण घेतले आहे. नुपूर अग्रवाल, प्रणव काबरा यांना ट्रॉफी व रोख पाच हजार ५०० रूपये, गौरी पांडे हिला ट्रॉफी व रोख चार हजार ५०० रूपये आणि आशय इंदूरकरला ट्रॉफी आणि रोख तीन हजार ५०० रूपयांचे बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. इतर यशस्वी विद्यार्थ्यांनाही वायपीएसतर्फे ट्रॉफी आणि रोख बक्षीस देवून गौरविले गेले. आंतरराष्ट्रीय फूटबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पूर्वा बोढलकर हिचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. नुपूर अग्रवाल, प्रणव काबरा, गौरी पांडे, आशय इंदूरकर यांच्या मनोगताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. अभ्यासातील सातत्य, दृढ इच्छाशक्ती, अभ्यासातील नियोजन, वाचन, या बाबी यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आई, वडिलांना गर्व वाटावा असेच कार्य आपण केले पाहिजे, असे विचार आशय याने मांडले. प्रसंगी शंकरराव सांगळे, मदनलाल कश्यप, जेकब दास, समन्वयक अर्चना कढव आदींनी विचार व्यक्त केले. संचालन व आभार संध्या सुब्रम्हण्यम यांनी मानले. शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.