शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

विद्यार्थी घेतात उघड्यावर शिक्षण

By admin | Updated: September 18, 2014 00:09 IST

आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत असताना महागाव तालुक्यातील शिरपूर येथील विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून अभ्यासाचे धडे

महागाव : आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत असताना महागाव तालुक्यातील शिरपूर येथील विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहे. पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत वर्गखोल्या मात्र चारच आहे. त्यामुळे चार वर्ग कधी झाडाखाली तर कधी वऱ्हांड्यात भरविल्या जातात. पाऊस आला तर एकाच खोलीत दोन-दोन वर्ग भरविण्याची वेळ शिक्षकांवर येते. पुसद-माहूर मार्गावर शिरपूर येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळा आहे. पहिली ते आठवीपर्यंत २१५ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या शाळेसाठी पूर्वी सहा खोल्या होत्या. परंतु दीड वर्षांपूर्वी दोन खोल्या पडल्या. त्यामुळे चारच वर्गखोल्यात विद्यार्थ्यांना बसावे लागते. मात्र पहिली ते आठवीचे आठ वर्ग चार खोल्यात बसविणे शक्य नसल्याने काही वर्ग वऱ्हांड्यात तर काही वर्ग शाळेच्या आवारात भरविले जातात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना खिचडीसुद्धा उघड्यावरच बसून खावी लागते. पावसाळ्यात तर मोठी कसरत करावी लागते. पाऊस आला की एका खोलीत दोन-दोन वर्ग भरविले जातात. या प्रकाराने विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे.वर्ग खोल्यांसाठी शाळेने वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे सरपंचासह गावकऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. छायाचित्रासह त्यांना दुरावस्थेची माहिती दिली. परंतु अद्यापही वर्गखोल्यांचे भिजत घोंगडे कायम आहे. अशा स्थितीत पालक आपल्या मुलांना बाहेरगावच्या शाळेत टाकण्याच्या तयारीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)