शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशाला महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे

By admin | Updated: January 27, 2015 23:39 IST

जगात भारताची ओळख तरुणांचा देश म्हणून आहे. आपल्या देशातील तरुणांच्या कौशल्याची संपूर्ण जगात मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतातील तरुण अतुलनीय कार्य करीत आहेत.

यवतमाळ : जगात भारताची ओळख तरुणांचा देश म्हणून आहे. आपल्या देशातील तरुणांच्या कौशल्याची संपूर्ण जगात मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतातील तरुण अतुलनीय कार्य करीत आहेत. देशाच्या विकासात तरुणांनी योगदान दिले तर आम्ही आणखी वेगाने विकासात पुढे जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी या दिशेने प्रयत्न करून गाव, शहर, राज्य आणि देशाचा विकास करण्यासाठी पुढे येऊन देशाला महासत्ता बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी येथे केले.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘युफोरिया-१५’ या स्नेहसंमेलनात उद्घाटक म्हणून ना. राठोड बोलत होते. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.जी.आर. बमनोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, कार्यक्रमाचे समन्वयक विभागप्रमुख प्रा. पंकज एम. पंडित उपस्थित होते. ना.संजय राठोड म्हणाले, यवतमाळच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या विकासात जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे विकासातील योगदान कुणालाही विसरणे शक्य नाही. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय तज्ज्ञांची नवी पिढी घडवित असून हे काम अखंडपणे महाविद्यालय करीत आहे. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना अशा स्नेहसंमेलनातून ऊर्जा मिळते. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे. यापूर्वीच्या सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. या संकटाच्या वेळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी तरुणांना खास करून विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्लाही यावेळी दिला. (नगर प्रतिनिधी)