शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कळंबच्या शाळेत आमदारांची धडक

By admin | Updated: December 22, 2016 00:09 IST

येथील जिल्हा परिषद बेसिक शाळेला आमदार डॉ.अशोक उईके यांनी बुधवारी आकस्मिक भेट दिली.

कळंब : येथील जिल्हा परिषद बेसिक शाळेला आमदार डॉ.अशोक उईके यांनी बुधवारी आकस्मिक भेट दिली. शालेय पोषण आहाराच्या धान्याची त्यांनी तपासणी केली. रजिष्टरमधील नोंदी अद्यावत नसल्याचे आढळून आले. शिजविलेल्या पोषण आहाराची चव घेऊन पालेभाज्या आणि तेल कमी असण्याविषयी जाब विचारला. शाळा परिसरातील नळातून पाणी गळती होत होती. नळाजवळ अन्न सांडलेले होते. याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्याध्यापिका गैरहजर होत्या. त्या बैठकीला गेल्याचे इतर शिक्षकांनी सांगितले. शिक्षकांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावे, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली. ‘बीआरसी’त शुकशुकाट बेसिक शाळेच्या परिसरातच असलेल्या गट संसाधन केंद्रालाही (बीआरसी) आमदार डॉ.अशोक उईके यांनी भेट दिली. कॉम्प्युटर आॅपरेटर व्यतिरिक्त एकही कर्मचारी तेथे आढळून आला नाही. याविषयी डॉ.उईके ंयांनी थेट गटशिक्षणाधिकारी एम.बी. सोयाम यांच्याशी संपर्क साधला. परंतु ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त करत कामकाज सुधारण्याची समज दिली. नजीकच्या काही दिवसांपासून येथे नेहमीच असा प्रकार होत असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे आमदार चांगलेच भडकले. आमदारांच्या भेटीनंतर शाळा आणि बीआरसीच्या कारभारात सुधारणेची अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)