शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दैैनावस्थेने विद्यार्थ्यांचे हाल

By admin | Updated: August 17, 2016 01:10 IST

नांदेपेरा ते भुरकी रस्ता चिखलाने माखला असून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना चिखल तुडवित जावे लागत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : पावसामुळे वाहून गेले नाल्यावरील पुल नांदेपेरा : नांदेपेरा ते भुरकी रस्ता चिखलाने माखला असून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना चिखल तुडवित जावे लागत आहे. रस्त्यावर मुरूम, गिट्टी डांबर नसल्याने ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मात्र प्रशासनाने यावर चुप्पी साधून बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नांदेपेरा ते भुरकी रस्त्याबाबत लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने हवेतच विरली आहे. याच मार्गाने विद्यार्थीसुद्धा शिक्षण घेण्यासाठी नांदेपेराला येतात. मात्र प्रशासनाला या रस्त्याने दळणवळण कमी होत असल्यामुळे या रस्त्याचे महत्व वाटत नाही. या रस्त्याने शेतकरीसुद्धा जात असून नांदेपेरा व भुरकी या गावातील अनेक ग्रामस्थांचे शेत रस्त्यालगत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात बि-बियाणे, खते, शेतीपयोगी अवजारे शेतात नेताना मोठी कसरत करावी लागते. गेल्या दोन वर्षापूर्वी याच मार्गावरील एका शेतात वीज कोसळली होती. तेव्हा जखमींना त्वरित रूग्णालयात दाखल करता आले नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांनी शेतात विष प्राशन केले. त्यांनासुद्धा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला. या रस्त्यावर कच्चे पुल निर्माण करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरू होताच हे पुल पूर्णपणे पाण्यात वाहून गेल्याने ये-जा करणाऱ्यांना साधे पायदळ जाता येत नाही. भुरकी येथील ग्रामस्थांचे बँक, शाळा, रास्तभाव दुकान, नांदेपेरा (पोहना) येथे असल्याने तेथे जावे लागते. त्यामुळे वृद्धांसह नागरिकांची चांगलीच परवड होत आहे. मात्र प्रशासनाला त्याची काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. स्वातंत्र्यानंतरही दोन गावाला जोडणारा रस्ता नसल्याची खंत ग्रामस्थांना वाटत आहे. रस्त्यावर मुरूम, गिट्टी तरी टाकून द्यावी, अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थ व नागरिक करीत आहे. (वार्ताहर)