शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो हार मानू नका, तोडगा निघू शकतो

By admin | Updated: June 11, 2014 23:38 IST

शहरात विद्यार्थी आत्महत्येच्या लागोपाठ पाच घटना घडल्याने शैक्षणिक तसेच पालकवर्गात खळबळ उडाली आहे. मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम

वाढत्या आत्महत्या : मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशकांचा विद्यार्थी व पालकांना सल्लायवतमाळशहरात विद्यार्थी आत्महत्येच्या लागोपाठ पाच घटना घडल्याने शैक्षणिक तसेच पालकवर्गात खळबळ उडाली आहे. मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांनीच विद्यार्थ्यांना सर्व समस्यांवर तोडगा काढता येतो, हार मानू नका, याची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. एकमेकांशी तुलना :विद्यार्थ्यांच्या या मानसिकतेबद्दल व पालकांच्या आग्रही वृत्तीबद्दल मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत देशमुख, सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. अविनाश शिर्के यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थी टीव्हीवरील सिरीयल, चित्रपटातील विद्यार्थ्यांचे आदर्श जीवन पाहून त्याची स्वत:शी तुलना करतात. तसेच आपसातही एकमेकांशी तुलना करतात. अमूक विद्यार्थी हुशार आहे. त्याचे आईवडील मदत करतात, अशा स्वरूपाची तुलनाही करतात. न्यूनगंड तयार होतो :आईवडीलही मुलांना त्यांच्या बरोबरीच्या मुलांचे उदाहरण देऊन बघ त्याला कसे चांगले गुण मिळाले, वगैरे तुलना करतात. त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर विशेषत: मध्यमवर्गीय घरातील मुलांच्या मनावर विपरित परिणाम होऊन न्यूनगंड तयार होतो. त्यातच अशी मुले जर हळव्या मनाची असतील तर आत्महत्येकडे वळतात. जीवघेणी स्पर्धा :अनेकदा आपल्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत आईवडिलांकडे नसल्याने ते अडचणीत आलेले पाहूनही मुलांना नैराश्य येते. त्यांना बँकेकडून शैक्षणिक कर्ज मिळू शकते. त्यामुळे आई-वडिलांवर शिक्षणाचा भार येत नाही, हे समजावून सांगितले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेऊनच चांगले करिअर होऊ शकते असे नाही तर इतरही अनेक क्षेत्रात भरपूर पैसे कमावण्याची संधी आहे, हे बिंबविणेही गरजेचे आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा कमी होऊन मुलांच्या मनावरील ताण कमी होईल. मानसिक आजारही जडतात :अनेकदा मुलांना मानसिक आजारही जडतात. मात्र आईवडील ते मान्य करायला तयार होत नाहीत. भारतात या आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. सर्वसाधारण परिस्थितीत मुले आत्महत्येकडे वळत नाहीत. आजाराकडे दुर्लक्ष झाले तर खूपच नैराश्य येऊन ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यामुळे या आजारांबाबतही सामाजिक उद्बोधनाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे. जरी मुले चुकली, तरीही त्यांना ती आपली मुले असल्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम असल्याची जाणीव पालकांनी त्यांना करून दिली पाहिजे. तसेच मुलांच्या वागणुकीत जर बदल जाणवला तर मुलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण झाले तर त्यांना नैराश्य येणार नाही.