शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

आश्रमशाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2015 02:16 IST

झरी तालुक्यातील शिबला येथील निवासी आश्रमशाळेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून तालुक्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करतात.

शिक्षकांचे अप-डाऊन : शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या जागाही रिक्तच, वरिष्ठांचे होतेय दुर्लक्षवणी : झरी तालुक्यातील शिबला येथील निवासी आश्रमशाळेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून तालुक्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करतात. त्यामुळे शिक्षणाची आबाळ होत आहे. सोबतच शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे.पूर्वी शिबला येथील आश्रमशाळेतील उत्तम शिक्षण, प्रशासन व शिस्तीमुळे अनेक पालकांची तेथे पाल्यांना प्रवेश देण्यासाठी गर्दी होत होती. मात्र गेल्या काही वर्षांत या आश्रमशाळेतील पटसंख्या सतत घसरत आहे. शिबला येथे निवासी आश्रमशाळा असतानाही काही शिक्षक व कर्मचारी आपल्या सोयीनुसार तालुक्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. काही शिक्षक तर जिल्ह्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. त्यामुळे ते अनेकदा शाळेवरही उशिरा पोहोचतात. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिबला परिसरात एखादे मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा असला, तरच शिक्षक रात्री आश्रमशाळेत उपस्थित राहतात. त्यांचा दौरा आटोपला की, पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. मागीलवर्षी राज्यपाल आले असताना ही आश्रमशाळा चकाचक करण्यात आली होती. शिक्षक, विद्यार्थी त्यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मात्र आता पुन्हा विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच आपल्या घराकडे जाण्याची जादा ओढ असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांवर मुख्याध्यापक व शिक्षकांचा वचक नसल्यामुळे विद्यार्थी शिबला चौपाटीवर ‘टाईमपास’ करताना आढळतात. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी पालकांची मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)