शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आधारकार्डासाठी विद्यार्थ्यांची भटकंती

By admin | Updated: July 19, 2015 02:39 IST

पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड काढणे बंधनकारक असल्याबाबतचा अध्यादेश शासनाने काढलेला आहे.

पालक चिंताग्रस्त : आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रांची शोधाशोधपुसद : पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड काढणे बंधनकारक असल्याबाबतचा अध्यादेश शासनाने काढलेला आहे. पुसद तालुक्यात काही ठिकाणी आधार नोंदणी केंद्रच नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. आधारकार्डची सक्ती असली तरी ते काढयचे कुठे असा प्रश्न पालकांकडून व्यक्त होत आहे. आधारकार्डचा क्रमांक विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्रमांकाशी जोडला जावा असा शासनाचा मानस आहे. त्यासाठी शाळेत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांकडून आधार गठीत करण्याचे निर्देश शासनाने दिले असल्याने शालेय स्तरावर आधाराची सक्ती केली जात आहे. मात्र केंद्राअभावी आजही बहुतेक पालक विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढता आलेले नाही. २०१४-१५ मध्ये पुसद तालुक्यातील व शहरातील बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी शाळेने संपूर्ण डाटा जमा केला होता. काही शाळेत फोटोसुद्धा काढण्यात आले तरी अद्यापपर्यंत ‘त्या’ विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळाले नाही. याचा शाळेनेसुद्धा पाठपुरावा संबंधितांकडे केलाच नाही. शासनाने सक्ती केल्यानंतर संस्थाचालकांना आधारकार्ड काढण्याची स्वतंत्र व्यवस्था शाळेतच करण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना आधारकार्डासाठी भटकंती करावी लागणार नाही. शाळेने आधारकार्डसाठी माहिती गोळा केली. पण अद्याप विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळालेच नाही. तसेच बहुतेक जांनी खासगी ठिकाणी आधारची नोंदणी केलेली आहे. त्याची रितसर पावतीही त्यांना प्राप्त झालेली नाही. मात्र पावतीवरून नोंदणी केलेले आधारच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह अनेक जण आधारकार्डापासून वंचित आहे. एकंदरित आधाराची सक्ती केली तशी आधार काढण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)