शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

करळगावात प्रेमप्रकरणातून विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: January 15, 2015 22:59 IST

लग्नाचे आमिष देत गावातीलच तरूणाने एका सोळावर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. शारीरिक शोषण केल्यानंतर त्याने चक्क लग्नास नकार दिला. त्यामुळे व्यथित

यवतमाळ : लग्नाचे आमिष देत गावातीलच तरूणाने एका सोळावर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. शारीरिक शोषण केल्यानंतर त्याने चक्क लग्नास नकार दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या एका विद्यार्थिनीने विषारी द्रव्य प्राशन केले. गुरूवारी येथील शासकीय रूग्णालयात तिचा मृत्यू झाला. ही गंभीर घटना तालुक्यातील करळगाव येथे घडली. श्वेता असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून करळगावची रहिवासी होती. बाभूळगाव तालुक्यातील चिमणाबागापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयातील ११ व्या वर्गात ती शिकत होती. गावातीलच अरविंद नामक तरूणाने तिला आपल्या जाळ्यात ओढले. भूलथापा आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले. त्यानंतर मात्र तो श्वेताला टाळत होता. तिने विचारणा केल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. त्यामुळे आई-वडीलांनी तिला विचारणा केली. तेव्हा खरा प्रकार उघड झाला. मात्र बदनामीच्या भीतीने त्यांनी हा प्रकार उघड केला नाही. दरम्यान अरविंदने श्वेताला त्रास देणे सुरू केले. या त्रासाला कंटाळून तिने ११ जानेवारीला दुपारी कुटुंबिय शेतात गेले असता घरीच विष प्राशन केले. हा प्रकार लहान बहिणीच्या लक्षात आला. त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पाच दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास श्वेताचा मृत्यू झाल्याची माहिती श्वेताच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी तूर्तास अकस्मात घटनेची नोंद घेतली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)