शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांची प्राधिकरणावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 20:59 IST

जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही भागात १६ दिवस लोटले तरी पाणी पोहोचलेच नाही. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. महिला धडकताच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचा पोबारा : १६ दिवस लोटले तरी पाणी आलेच नाही

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात काही भागात १६ दिवस लोटले तरी पाणी पोहोचलेच नाही. यामुळे संतप्त महिलांनी सोमवारी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. महिला धडकताच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोबारा केला. यामुळे महिलांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. पाण्याचे समान वाटप करण्याची मागणी केली आहे.धामणगाव मार्गावरील गांधीनगर, नेहरूनगर, नारिंगेनगर आणि बांगरनगर भागात गत १६ दिवसांपासून पाण्याचा थेंब आला नाही. विशेष म्हणजे, प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकात या भागाचे नावच नाही.यामुळे प्राधिकरणाच्या लेखी हा भाग निर्मनुष्य तर झाला नाही ना, असा जाब विचारण्यासाठी महिला प्राधिकरणावर धडकल्या होत्या. अधिकाऱ्यांना याची कुणकुण लागताच अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. यामुळे संतप्त महिलांना या ठिकाणी कुणीही भेटले नाही. प्रश्न न सुटताच त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.या भागातील महिलांनी पाण्याच्या असमान वाटपावर तीव्र शब्दात नाराजी नोंदविली. तत्काळ दुरूस्ती न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. यावेळी श्रृतिका वाघ, अर्चना राठी, पूजा राठी, शोभा दर्डा, जयश्री दानव, विद्या देशपांडे, माधुरी ठाकरे, मंगला महानुर, वसुधा देशमुख, सुनिता धारगावे, ललिता विधाते, प्रिती चन्ने, गीता लचके, प्रतिभा कुकडे आदी महिला उपस्थित होत्या.या आहेत प्रमुख समस्याशहरात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे.काही भागात २४ तास नळ सुरू आहेत.पाणी पुरवठ्याच्या वेळा पाळल्या जात नाही. मध्यरात्रीनंतरही नळ येतात.मिळणारे ७० टक्के पाणी गढूळ असते.वेळापत्रकात बदल झाला तरी सांगितला जात नाही.