उत्स्फूर्त प्रतिसाद : पुसद विकास मंचच्या नेतृत्वात हजारो नागरिक रस्त्यावर पुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्य दिनी पुसद विकास मंचच्यावतीने संघर्ष रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध शैक्षणिक, सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीत पुसद जिल्हा झालाच पाहिजे, अशा घोषणांनी पुसद शहर दणाणून गेले होते. पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळला आहे. पुसद जिल्हा व्हावा, अशी जनतेची भावना आहे. जिल्ह्याच्या ठिकाणासाठी आवश्यक सर्व बाबी पुसदमध्ये आहे. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी पुसद जिल्ह्याचा प्रश्न कायम आहे. आता पुसद जिल्हा निर्मितीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुसद विकास मंचने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनी महात्मा गांधी चौकापासून रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीचा समारोप टिकळ स्मारक मैदानावर करण्यात आला. संपूर्ण पुसद शहरातून गेलेल्या या रॅलीने शहर दणाणले होते. या रॅलीत कोषटवार विद्यालय, पुसद अर्बन बँक, गुणवंतराव देशमुख महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, गुलामनबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुसद डॉक्टर असोसिएशन, पुसद नगर परिषद, पुसद वकील संघ, चेंबर आॅफ कॉमर्स, विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब, कॉमर्स अॅकेडमी, ज्येष्ठ नागरिक संघ, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, मनसे, भारिप बहुजन महासंघ, आरपीआय कवाडे गट, पत्रकार संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, माजी सैनिक संघटना, जय मल्हार सेना आदींचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीला पुसदकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, शरद मैंद, ययाती नाईक, अॅड. आशिष देशमुख, डॉ. वजाहत मिर्झा, विजय जाधव, डॉ. मोहंमद नदीम, अॅड. उमाकांत पापीनवार, डॉ. भानुप्रकाश कदम, अनिल शिंदे, मुख्याध्यापक अनिल जोशी, विनोद जिल्हेवार, जकी अनवर, अजय पुरोहित, डॉ. अब्दूल रऊफ शेख, डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. उत्तम खांबाळकर, डॉ. राजेश वाढवे, अॅड. अशोक महामुने, ज्ञानेश्वर तडसे, बाबा उंटवाल, विश्वास भवरे, नामदेव फाटे, आशाताई चापके, पुंडलिकराव टारफे, भारत पाटील, पवन बोजेवार, विश्वजित सरनाईक आदी सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी पुसद विकास मंचचे अॅड. सचिन नाईक, अभय गडम, निशांत बयास, रवी ग्यानचंदाणी, धनंजय सोनी, अॅड. चंद्रशेखर शिंदे, सुरज डुबेवार, निखील चिद्दरवार, कैलास जगताप, संजय भंडारी, डॉ. संजय भांगडे, धनंजय अत्रे, कैलास राठोड, राहुल कांबळे, पंकज पारधे, डॉ. उमेश रेवणवार, किरण देशमुख, बाळासाहेब बरडे, संजय बजाज, डॉ. नसुरूल्ला खान, श्रीकांत सरनाईक, अजय क्षीरसागर, राजू येरावार, शशांक गावंडे, गिरीष अनंतवार, शाकीब शाह, रमेश कोषटवार, शकील बागवान, राजाराम काळे, अब्दूल रहेमान चौहान, नाना बेले यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हा निर्मितीसाठी संघर्ष रॅली
By admin | Updated: August 17, 2015 02:38 IST