शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नेर तालुक्याला वादळाचा तडाखा

By admin | Updated: June 10, 2015 02:30 IST

तालुक्यात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळाने मांगलादेवी परिसरासह तालुक्याला तडाखा दिला.

८३ वीज खांब कोसळले : मांगलादेवी परिसरात जोरदार पाऊसनेर/मांगलादेवी : तालुक्यात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळाने मांगलादेवी परिसरासह तालुक्याला तडाखा दिला. वादळात अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली असून अनेक वृक्ष उन्मळून पडली. वीज वितरणचे ८३ खांब कोसळले असून केळी आणि संत्रा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आकाश काळ्या ढगांनी व्यापून गेले. सोसाट्याच्या वाऱ्य्ाांंसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या वादळाने मांगलादेवी, टाकळी, मंगरुळ आदी गावांना तडाखा दिला.जवळपास २२ मोठ्ठाले वृक्ष तुटून पडले. चिखली, मांगलादेवी, टाकळी, मंगरुळ, आजंती येथील अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली. अनेक घरे क्षतीग्रस्त झाली. माणिकवाडा येथील प्रेम गवई यांचा फोटो स्टुडिओ व मनोज कातोरे यांच्या पानटपरीवर मोठ्ठा वृक्ष उन्मळला. मंगरुळ येथील वसंत जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील २२९ केळीची झाडे तुटून गेली. मांगलादेवी येथील जिल्हा परिषद शाळेवरील टीनपत्रे उडाली. नेर-चिखली मार्गावरील उच्चदाब वाहिनी आणि लघुदाब वाहिनीवरील अनेक खांब तुटल्याने तसेच चार डीपी वाकल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य होते. नेर परिषदेची सुरक्षा भिंत या वादळात पडली. तसेच वीज खांब तुटल्याने शहराचा वीज पुरवठा खंडित होता. तो रात्री १ वाजताच्या दरम्यान सुरू झाला. ग्रामीण भागात अद्यापही अंधाराचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी कोसळलेले वृक्ष त्याच स्थिती होते. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू करणार असल्याचे वीज वितरणचे सहायक अभियंता सतीश कानडे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र राऊत यांनी सांगितले. तहसील प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.