शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळा जलवाहिनीचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:13 IST

यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे १५ दिवस लोटले : पाण्याचा एप्रिलचा मुहूर्त टळण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरणातून यवतमाळपर्यंत पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले. यातून यवतमाळ शहर व परिसरात पाण्याच्या १६ उंच टाकी बांधल्या जाणार आहे. मुख्य जलवाहिनी, उपजलवाहिन्या व शहरात सर्वत्र पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे जाळे नव्याने विणले जाणार आहे. जॅकवेल, फिल्टर प्लँट या कामांचाही त्यात समावेश आहे.फिल्टर प्लँट, टाकी, पाईपलाईन हे मुख्य काम साडेतीनशे कोटींचे आहे. या कामांचे कंत्राट नाशिक येथील शासकीय कंत्राटदार पी.एल. अडके यांना मिळाले आहे. या कामात चौघे भागीदार आहेत. अडके यांना या कामासाठी हरियाणाच्या गौरवकुमार यांनी फायनान्स केले आहे. या कामावरील देखरेखीसाठी कंत्राटदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर (कारंजा) यांची नियुक्ती केली आहे. या संपूर्ण कामाचे ड्रॉर्इंग व सुपरव्हीजन बोरकर यांचे आहे.बेंबळा ते यवतमाळ या जलवाहिनीच्या कामासाठी फायनान्सर स्वत: यवतमाळात तळ ठोकून आहे. सद्यस्थितीत पाण्याच्या १६ टाकींचे २० टक्के बांधकाम झाले आहे. शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी फायनान्सर गौरवकुमार आणि अभियंता बोरकर यांच्यात वाद झाला. त्यातूनच बोरकर दोन आठवड्यांपूर्वी काम सोडून गावाकडे निघून गेले. तेंव्हापासून पाणीपुरवठ्याचे हे काम बंद आहे.बेंबळाचे पाणी एप्रिलपूर्वी यवतमाळात आणायचेच, यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांची धडपड आहे. एक-एक दिवस महत्वाचा असल्याचे ते अधिकाºयांना सांगतात. तर दुसरीकडे आता १५ दिवसांपासून चक्क प्रमुख कामच बंद असल्याने मार्च-एप्रिलपर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात येणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पालकमंत्र्यांकडून कंत्राटदाराची झाडाझडतीकाम बंद असल्याची कुणकुण लागताच पालकमंत्री मदन येरावार यांनी कंत्राटदार अडके, फायनान्सर गौरव कुमार यांना बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. वेळप्रसंगी काम काढून घेण्याची तंबीही त्यांना दिली.सहा स्थानिक कंत्राटदारबेंबळावरून पाणी आणण्याच्या मुख्य कामाचे तुकडे पाडून ते स्थानिक शकील, चव्हाण, समदूरकर, शर्मा, मांगूळकर, कुटे यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते.