शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको

By admin | Updated: June 5, 2014 00:02 IST

येथील बाजार समितीमध्ये दोन दिवसापासून शेतकरी मुक्कामी आहे. नवीन बाजार समितीच्या यार्डात व्यापार्‍यांचा माल शेडमध्ये असून शेतकरी उघड्यावर माल टाकत आहे. तुरळक पावसाच्या सरीने शेंगा

बाजार समिती विरोधात निदर्शने : व्यापार्‍यांनी भुईमुगाचे भाव पाडलेआर्णी : येथील बाजार समितीमध्ये दोन दिवसापासून शेतकरी मुक्कामी आहे. नवीन बाजार समितीच्या यार्डात व्यापार्‍यांचा माल शेडमध्ये असून शेतकरी उघड्यावर माल टाकत आहे. तुरळक पावसाच्या सरीने शेंगा ओल्या झाल्यानंतर व्यापार्‍यांनी बुधवारी दुपारी हर्रास न करता भुईमूगाचे भाव पाडले. तब्बल दहा किलोची कट्टी घेणार असल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर ठिय्या दिला.निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत शेतकरी यावर्षी कसा तरी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. खरीप आणि रबी हंगामात शेतकर्‍यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याची तीव्रता कमी करण्यासाठी उन्हाळी भुईमूगाची लागवड केली. त्यावरही वातावरणाची अवकृपा झाली होती. आता बाजारपेठेत शेंगा घेऊन आलेल्या शेतकर्‍याला आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न व्यापारी व बाजार समिती व्यवस्थापनाकडून केला जात आहे. तालुक्यातील दाभडी, तेंडूळी, जवळा, दत्तरामपूर, सातारा येथील शेतकरी दोन दिवसापासून शेंगा घेवून मुक्कामी आहे. शेडमध्ये व्यापार्‍याचा माल असल्याने या शेतकर्‍यांना उघड्यावरच शेंगा टाकाव्या लागल्या. वेळेवर हर्रास सुरू झाला नाही. तितक्यातच पावसाच्या सरी कोसळल्या हीच सबब पुढे करत शेंगा ओल्या झाल्या म्हणून क्विंटल मागे दहा किलोची कट्टी द्यावी लागेल, अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतली. त्यानंतरही दुपारपर्यंत हर्रास सुरू झालाच नाही. शेवटी शेतकर्‍यांच्या संयमाचा बांध फुटला. पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या मुरडल्या जात असल्याचे लक्षात येताच हतबल शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तुळजापूर मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. या दाभडीतील सरपंच संतोष टाके, अतुल मुनगिनवार, दीपक गायधने, गणेश राठोड, सुनील नागोसे, जयंत पाटील, साखरकर, दिगांबर राठोड, मनोज चव्हाण, रमेश आडे, अतुल चव्हाण यांच्यासह बाजार समितीत असंख्य शेतकरी रस्त्यावर उतरून बाजार समिती प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत होते. आर्णी बाजार समितीत शेतकर्‍यांना लुटण्याचेच काम सुरू आहे. येथे व्यवस्थापनाकडूनही व्यापार्‍यांचीच बडदास्त ठेवल्या जाते. अनेक महिन्यांपासून शेडमध्ये असलेला व्यापार्‍यांचा माल खाली करण्याची तसदी बाजार समिती प्रशासनाने घेतली नाही. त्यांच्या या मनमानीमुळेच शेतकर्‍यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. परिणामी पाऊस आल्यानंतर तेच व्यापारी शेतकर्‍यांच्या मालाला कवडीमोल दरात खरेदी करण्याची भाषा करत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना आंदोलनाचा पवित्रा घेण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही. मोठय़ा संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत असताना त्यांची समजूत काढण्यासाठी पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले. मात्र या संदर्भात चर्चेतून वृत्त लिहेपर्यंत तरी कोणताही तोडगा निघाला नव्हता. शेंगा ओल्या झाल्याचे कारण पुढे करत शेतकर्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न व्यापार्‍यांकडून सुरूच होता. (तालुका प्रतिनिधी)