शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

तूर खरेदीसाठी आर्णी येथे रास्ता रोको

By admin | Updated: March 18, 2017 00:43 IST

ढगाळ वातावरण आणि बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण देत बंद असलेली एफसीआयची तूर खरेदी पूर्ववत सुरू करावी,

काँग्रेस, प्रहारचे आंदोलन : टायर जाळले, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग एक तास ठप्प आर्णी : ढगाळ वातावरण आणि बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण देत बंद असलेली एफसीआयची तूर खरेदी पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी आर्णी येथे संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस व प्रहारच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी चक्काजाम केला. रस्त्यावर टायर पेटविल्याने नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात एफसीआयची तूर खरेदी सुरू आहे. परंतु दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बारदाना संपल्याचे सांगत ही तूर खरेदी बंद करण्यात आली. तसेच गुरुवारी आलेल्या पावसाने उघड्यावरील तुरी ओल्या झाल्या. यामुळे शेतकरी संतप्त होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता बाजार समितीच्या नवीन यार्डासमोर काँग्रेस व प्रहारच्यावतीने टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अनिल आडे, राजू बुटले, परशराम राठोड, सुनील भारती, खुशाल ठाकरे, प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद कुदळे, आकाश राठोड, प्रवीण देशमुख, सचिन अगलदरे, अतुल मुनगिनवार आदी उपस्थित होते. तब्बल तासभर केलेल्या आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार सुधीर पवार, सहायक निबंधक सुरेश अंबिलपुरे, आर्णी बाजार समितीचे सचिव विशाल राठोड, एफसीआयचे विजय भालारकर, आर्णीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वळवी, राजकुमार मडावी, गणेश हिरूळकर आदींनी मध्यस्थी केली. शेवटी एफसीआयने तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)