शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

धनगर समाजातर्फे रस्ता रोको

By admin | Updated: August 15, 2014 00:45 IST

वाहतूकखोळंबली : आरक्षणाचा मुद्दा पेटला !

सोलापूर : ‘जय अहिल्या, जय मल्हार’ अशा घोषणा देत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी व तिसऱ्या सूचीचा समावेश करण्यास विरोध करीत धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले़ परिणामी जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य व अन्य ठिकाणच्या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती़अकलूज : पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील नीरा नदीच्या पुलावर गुरुवारी सकाळी ११ वाजता धनगर समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. माळशिरस तालुक्यातील नातेपुते, वेळापूर, खुडूस, माळशिरस, श्रीपूर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केल्याने सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य आरक्षण समितीचे समन्वयक शंकरराव काळे-पाटील यांनी आपल्या भाषणातून आम्ही इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून द्या, अशी मागणी करत नाही व आम्हाला सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही करायचे नाही. आमचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत शांततेच्या मार्गानेच सुरू राहील, असे स्पष्ट केले. धनगर समाज व मोहिते-पाटील परिवाराचे तीन पिढ्यांपासून संबंध असून धनगर समाजाला आरक्षण लागू करण्याविषयी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र दिले असून, धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण विजयदादांच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे आश्वासन माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिले. यावेळी उल्हास वाघमोडे, अनिल पाटील, विनोद गडदे, बाळासाहेब वाघे, राजेंद्र नरूटे, सचिन आगलावे, आबा घुले, नाथा रूपनवर, दादासाहेब कोल्हटकर, तानाजी खरात, सर्जेराव काळे, भोजराज माने, पिंटू सुळ, नाना काळे, माऊली सरगर, बंडू सातपुते, विशाल करे, बबलू गडदे, अजित बोरकर, सुकुमार पाटील, अनिल कोयले आदी उपस्थित होते. प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनपंढरपूर : धनगर समाज आरक्षण कृती समाज समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात आज पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. पंढरपूर ते पुणे रस्त्यावर चक्का जामसह प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सकाळी ११ वाजता पंढरपूर-पुणे रस्त्यावरील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे रस्ता रोको केला. यावेळी स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. त्यामुळे बराच वेळ वाहनांची कोंडी झाली होती. यावेळी धनगर समाज कृती समितीतर्फे तहसीलदार गजानन गुरव यांनी निवेदन दिले.यावेळी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक प्रकाश जाधव, पो़नि़ के. एन. नावंदे, पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्यासह धनगर समाज आरक्षण कृती समितीचे शालिवाहन कोळेकर, मारुती केसकर, पांडुरंग घंटी, विठ्ठल पाटील, भारत कोळेकर, विक्रम कोळेकर, औदुंबर मेटकरी, माणिक बनसोडे, बाळासोा गडदे, काशिनाथ लवटे, पंडित शेंबडे, औदुंबर मेटकरी, अण्णा शेंडगे आदी उपस्थित होते. बार्शी : शहर व तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तिसऱ्या सूचीला विरोध करण्यासाठी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिल्याने आज बार्शी येथे अर्धा तास आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वा. मुख्य पोस्ट कार्यालयातील चौकात स्आंदोलन करण्यात आले. यावेळी कृती समितीच्या वतीने निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड, पो़नि़ सालार चाऊस यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक हरिभाऊ कोळेकर, आप्पा शेंडगे, राहुल शेंडगे, करडे, नरोटे यांनी मनोगत व्यक्त केले.चक्का जाम आंदोलन सुरू होताच बार्शी-कुर्डूवाडी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या आंदोलनात बसवराज कुंटोजी, बाळासाहेब पाटील, आप्पा शेंडगे, खंडू नरोटे, शीतल पाटील, राहुल शेंडगे, बन्नी होनमाने, गुणवंत खांडेकर, अरुण येळे, अक्षय खरात, हंबीर नरोटे, सचिन शेंडगे, दीपक खरात यांच्यासह अनेक धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी पो़ नि़ सालार चाऊस यांनी बंदोबस्त ठेवला होता.सांगोला : सांगोला शहरातील मिरज रेल्वे गेट व वाढेगाव नाका याठिकाणी धनगर समाजाच्या वतीने शहरातून रॅली काढून शेळ्या-मेंढ्यांसह रस्ता रोको करीत ठिय्या मांडला. या आंदोलनास शहरातील व्यापारी संघटनेने पाठिंबा देऊन दुकाने बंद ठेवून सामील झाल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. बंददरम्यान मिरज रेल्वे गेटजवळ किरकोळ प्रकार वगळता आंदोलन शांततेत पार पडले. महुद बु॥ येथील मुख्य चौकात सकाळी १०.३० ते दु. २.३० पर्यंत रस्ता रोको करीत चौफेर ठिय्या मांडला. यावेळी धनगर समाजबांधवांनी मुख्य चौकातच गजीढोलच्या तालावर फेर धरल्याने सर्व बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. आज (गुरुवारी) महुद बु॥ चा आठवडा बाजार असल्याने रस्ता रोकोमुळे बाहेरगावाहून आलेल्या व्यापारी नागरिकांना त्रास सहन करावा लागला.या रस्ता रोकोप्रसंगी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी माजी आ. अ‍ॅड. शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या वतीने पाठिंबा व्यक्त करीत आघाडी शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. घेरडी, जवळा, महिम, चिकमहुद, शिवणे, शिरभावी मार्गावर रस्तारोको करीत आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडल्याने दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. आंदोलनादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर करांडे, पो. नि. अजय कदम यांनी चोख बंदोबस्त ठेवला. कोळा : जुनोनी येथे सोलापूर-कोल्हापूर या मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक खोळंबली होती. हातीद, कोळा, जुनोनी, गौडवाडी, बुद्धेहाळ, जुजारपूर, तिप्पेहाळी, डोंगरगाव यामध्ये बंद यशस्वी झाला. आंदोलनानंतर तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक किशोर कारंडे, पोलीस निरीक्षक अजय कदम यांना निवेदन देण्यात आले. मंद्रुप : कंदलगाव येथेही दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव बाळासाहेब शेळके, माजी मंत्री आनंदराव देवकते, तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे, अर्जुनराव टेळे, डॉ़ महादेव जोकारे, श्रीमंत पुजारी, लहू माशाळे उपस्थित होते़ ----------------------------------आमच्या अहिंंसात्मक आंदोलनाबद्दल राज्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. वेळ पडलीच तर धनगराची लेकरं कोणालाही घाबरणार नाहीत. आम्ही रस्त्यावर उतरलो तर आम्हाला जेलमध्ये टाकायला राज्यातल्या जेलही कमी पडतील. वेळीच शासनाने धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण करून सहकार्य करावे.- शंकरराव काळे-पाटील, समन्वयक, महाराष्ट्र राज्य आरक्षण कृती समिती------------------------दोन महिन्यांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीकरिता धनगर समाजाचे शांततेने आंदोलन सुरु आहे. तिसऱ्या सूचीत समावेशास विरोध असून अनुसूचित जमातीमध्ये समावेश होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.- चंद्रकांत देशमुखसंचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक