शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

घाटंजी तहसील कार्यालयासमोर तलाठ्यांचे काम बंद आंदोलन

By admin | Updated: December 13, 2014 22:47 IST

येथील तहसील कार्यालयासमोर विदर्भ पटवारी संघाच्यावतीने धरणे देण्यात आले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी तलाठी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे.

घाटंजी : येथील तहसील कार्यालयासमोर विदर्भ पटवारी संघाच्यावतीने धरणे देण्यात आले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी तलाठी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे. शासन दरबारी गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र यावर शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विदर्भ पटवारी संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तालुक्यातील शिवणी येथील तलाठी पी.के. दुधे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. याप्रकरणात आम आदमी विमा योजनेच्या लाभासाठी लाभार्थी व ग्रामसेवक यांनी संगनमताने खोटा दाखल तयार करून जिवीत व्यक्तीला कागदोपत्री मृत दाखविले. विमा कंपनीकडून मृत्यू दाव्यातून मिळणारी रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला. या दाव्यावर नोडल एजन्सी तत्कालिन नायब तहसीलदार यांनी तलाठ्यास सही करण्यास भाग पाडले. शासनाच्या निर्देशानुसार ही कामे महाराष्ट्र शासन व विशेष सहाय्य विभागाकडून करून घेण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. याबाबतचे निवेदन आॅगस्ट २०१२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तरीही आम आदमी विमा योजनेच्या प्रकरणात तलाठ्यांवर कार्यवाही करण्यात आली. अधिकाऱ्यांना सोडून तलाठ्याचा बळी देण्याचा प्रकार येथे केल्या जात आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, तलाठ्यांकडचा अतिरिक्त प्रभार काढण्यात यावा, श्रावण बाळ योजनेच्या जुन्या केसेसे कुठे गहाळ झाल्या याची चौकशी व्हावी, आरडीची रक्कम पगारातून कपात होऊनही नियमित भरल्या जात नाही, तलाठ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मेहनताना देण्यात यावा यासह इतरही मागण्या तलाठी संघाने केल्या आहे. (प्रतिनिधी)