शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
3
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
4
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
5
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
7
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
8
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
9
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
10
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
11
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
12
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
13
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
14
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
15
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
16
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
17
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
18
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
19
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
20
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले

वटफळीजवळ दोन तास रास्ता रोको

By admin | Updated: July 11, 2015 00:16 IST

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी नेर-अमरावती मार्गावरील वटफळीजवळ तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले.

नेर-अमरावती मार्ग : ट्रकच्या धडकेत तरुण गंभीर नेर : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी नेर-अमरावती मार्गावरील वटफळीजवळ तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडलेल्या या प्रकाराने वाहतूक ठप्प झाली होती. तर अपघातात गंभीर जखमी तरुणाला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाचणगाव येथून अमोल विनोद गुल्हाने (२७) रा. नबाबपुरा नेर हा दुचाकी एम.एच.२९-ए.एफ-९९१५ ने शुक्रवारी दुपारी नेरकडे येत होता. दरम्यान यवतमाळवरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक एम.एच.३४-७४६१ ने वटफळी बसस्थानकाजवळील वळणावर दुचाकीला धडक दिली. यात अमोल गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ नेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी यवतमाळला रवाना करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताचे तीव्र पडसाद वटफळी येथे उमटले. मनसेचे तालुका प्रमुख बाळासाहेब कठाडे, रोशन खोब्रागडे यांच्यासह शेकडो गावकऱ्यांनी गतिरोधकाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले. तब्बल दोन तास या मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. वटफळी येथील वळणावर जोपर्यंत गतिरोधक तयार केला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे आंदोलक म्हणत होते. या वळणावर आतापर्यंत दहा ते पंधरा अपघात झाले आहे. अनेक दिवसांपासून गतिरोधकाची मागणी सुरू आहे. परंतु ती पूर्ण झाली नाही. त्यातच शुक्रवारी अपघात झाल्याने नागरिक संतप्त झाले. दरम्यान ठाणेदार गणेश भावसार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पनपालिया यांनी आठ दिवसात गतिरोधक तयार करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. परंतु दोन तास वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. (तालुका प्रतिनिधी)