शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे दोन लाखांची तूर चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:17 IST

येथील वखार महामंडळाच्या गोदामातून चोरट्यांनी तुरीचे तब्बल ८५ कट्टे चोरून नेले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ४२ क्विंटल ५० किलो वजनाच्या या तुरीची किंमत बाजारभावानुसार दोन लाख १२ हजार रुपये आहे.

ठळक मुद्देवखार महामंडळ : गोदामात शेतकऱ्यांचा शेतमालच असुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील वखार महामंडळाच्या गोदामातून चोरट्यांनी तुरीचे तब्बल ८५ कट्टे चोरून नेले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ४२ क्विंटल ५० किलो वजनाच्या या तुरीची किंमत बाजारभावानुसार दोन लाख १२ हजार रुपये आहे.शहरातील आर्णी मार्गावर वखार महामंडळाची गोदामे आहे. या गोदामात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी आपला शेतमाल साठवून ठेवला आहे. वखार महामंडळाच्या गोदामात आपला शेतमाल सुरक्षित राहतो, अशी शेतकरी व व्यापाºयांची समजूत आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी व व्यापारी या गोदामात आपला मात्र सुरक्षितरित्या साठवून ठेवतात. मात्र आता याच गोदामात चोरी झाल्याने शेतमालाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या गोदाम क्रमांक ५ च्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी तुरीचे ८५ कट्टे लंपास केले. सोमवारी रात्रपाळी दरम्यान पोलिसांची गस्त आणि वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात चौकीदार असतानासुद्धा चोरीची एवढी मोठी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी महामंडळ कर्मचाºयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेतमाल निघाल्यानंतर मालाला योग्य भाव मिळत नसल्याने बाजारात तेजी येईपर्यंत शेतकरी व व्यापारी भाडे भरून गोदामात शेतमाल ठेवतात.ती तूर आर्णीच्या व्यापाऱ्याचीगोदाम क्रमांक पाचमध्ये नाफेडसह शेतकरी आणि व्यापाऱ्यांची तूर साटवून आहे. चोरीस गेलेली ती तूर चव्हाण प्लायवूड आर्णी यांच्या नावाने ठेवलेली आहे. तूर चोरताना काही पोते फाटल्याने गोदामापासून काही अंतरावरपर्यंत तूर सांडून होती. त्यामुळेच ही घटना उघडकीस आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, चोरट्यांनी केवळ तीच तूर चोरून नेली. इतर शेतकरी व व्यापाºयांची तूर मात्र तूर्तास सुरक्षित असल्याचे वखार महामंडळाकडून सांगितले जाते.