शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पुलावरुन अजूनही वाहतूक सुरू

By admin | Updated: August 5, 2016 02:37 IST

तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली.

धोका टाळण्यासाठी वाहतूक बंद करणे गरजेचे कळंब : तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करणे गरजेचे झाले आहे. कळंब-नागपूर मार्गावरील शिरपूरजवळ वर्धा नदीवर ब्रिटीश कालावधीत दगडांचा वापर करून मोठा पूल निर्माण करण्यात आला. आत्तापर्यंत याच पुलावरून वाहतूक सुरू होती. मात्र साधारणत: दहा वर्षांपूर्वी तेथे नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे मुख्य वाहतूक आता नवीन पुलावरुन होते. परंतु अजूनही जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: थांबली नाही. दुचाकी, बैलगाडी, सायकल एवढेच नव्हे, तर ट्रकचीसुध्दा वाहतूक जुन्या पुलावारुन होत आहे. शिरपूर गावातील बरेचसे लोक याच पुलाचा वापर करीत आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कळंब शहरातून वाहणाऱ्या चक्रावती नदीवरसुद्धा इंग्रज काळात दगडाने बांधलेला पूल आहे. तेथेही नजीकच्या काळापर्यंत याच पुलावरुन वाहतूक सुरु असायची. परंतु मागील पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली. असे असले तरीही जुन्या पुलावरील वाहतूक अद्याप सुरूच असते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्याची गरज आहे. शिरपूर येथील वर्धा नदी व कळंब येथील चक्रावती नदीवर नवीन पूल निर्माण होण्यापूर्वी मोठा पूर आला की जुन्या पुलावरून पाणी वाहायचे. त्यामुळे वाहतूक ठप्प पडायची. परंतु नवीन पूल निर्माण झाले तेव्हापासून कधीही पुलावरुन पाणी गेलेले नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यू.व्ही.राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ब्रिटीशकालीन पुलाची कुठलीही माहिती आमच्या विभागाकडे नाही. कळंब तालुक्यामधून जाणाऱ्या राज्य मार्गावर कुठलाही पूल धोकादायक असल्याचा अहवाल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.