लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : घरात येत असलेल्या पांढऱ्या सोन्याला निसर्गाची दृष्ट लागली आहे. शेतकऱ्यांचे येणाऱ्या काळातील सण, उत्सव चांगले साजरे होईल असे उत्पन्न होत असतानाच पावसाची सतत रिपरिप सुरू आहे. यामुळे झाडालाच ओला झालेला कापूस घरात आणून टाकला आहे. या कापसाची दुर्गंधी सुटल्याने तो वाळविला जात आहे. यासाठी कुलर, पंख्याची हवा दिली जात आहे. ऊन पडलेच तर कापूस वाळविण्यासाठी अंगणात टाकला जात आहे. तालुक्याच्या सर्वदूर असलेले हे चित्र शेतकऱ्यांची चिंता वाढवित आहे.परिसरात सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे पऱ्हाटी जोमात होती. या पिकाला कापूसही चांगला फुटला. आता घरात पीक येणार ही परिस्थिती असतानाच गेली काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. थोडीही उसंत पाऊस घेत नसल्याने फुटलेला कापूस झाडालाच ओला होत आहे. गळून पडून मातीत खराब होवू नये यासाठी वेचून घरी आणला जात आहे. आता ओल्या कापसाच्या दुर्गंधीने घरात बसणेही कठीण झाले आहे.झाडाला असलेल्या सोयाबीनलाच कोंब फुटली. हा शेतमाल खराब झाला. लागवड खर्चाइतकेही उत्पादन होण्याविषयी शंका आहे. त्यामुळे सर्व मदार कपाशीवर आहे. आता हे पीकही घरात येवून पडले आहे. ते विकताही येत नाही. वाळण्यासाठी आणखी किती दिवस लागणार आणि भाव काय मिळणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कुलर आणि पंख्याचा आधार घेवून कापूस वाळविण्याच्या प्रयोगावर विद्युत कंपनीही पाणी फेरत आहे. वारंवार वीज गुल होते. केव्हा येईल याचा नेम राहात नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.
पावसाने भिजलेल्या पांढऱ्या सोन्याला सुटली दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST
परिसरात सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे पऱ्हाटी जोमात होती. या पिकाला कापूसही चांगला फुटला. आता घरात पीक येणार ही परिस्थिती असतानाच गेली काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. थोडीही उसंत पाऊस घेत नसल्याने फुटलेला कापूस झाडालाच ओला होत आहे. गळून पडून मातीत खराब होवू नये यासाठी वेचून घरी आणला जात आहे. आता ओल्या कापसाच्या दुर्गंधीने घरात बसणेही कठीण झाले आहे.
पावसाने भिजलेल्या पांढऱ्या सोन्याला सुटली दुर्गंधी
ठळक मुद्देशेतमाल कुलरच्या हवेत : पावसाच्या हजेरीने शेतकरी मेटाकुटीस, जोमात असलेल्या पिकाला लागली दृष्ट