शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या लेखी दरोडा सदृश्य स्थिती

By admin | Updated: July 9, 2014 23:54 IST

राखीव वनातील दोनशेवर सागवान वृक्षांची कत्तल करून सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकडाची तस्करी करण्यात आली. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतरही ती हिवरी वनपरिक्षेत्र

हिवरी वनपरिक्षेत्र : दोनशेवर सागवान वृक्षांच्या तस्करीचे प्रकरणयवतमाळ : राखीव वनातील दोनशेवर सागवान वृक्षांची कत्तल करून सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकडाची तस्करी करण्यात आली. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतरही ती हिवरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चौकशी न लावता १५ दिवस दडपून ठेवली. आता प्रकरण अंगलट येईल, या भीतीने त्याची सावरासारव करण्यात येत आहे. त्यातूनच वृक्ष कत्तल आणि चोरीचे वेगवेगळ्या दिवशी पीओआर (चोरीची नोंद) फाडण्यात आले. एवढेच नव्हे तर ही घटना दरोडा सदृश्य आणि अचानकपणे तेही विशिष्ट वेळेत झाल्याचा युक्तीवाद हिवरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला आहे. हिवरी वनपरिक्षेत्रातील राखीव वनात रस्त्याला लागूनच असलेली दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. तलावाच्या काठी त्यातही वन चौकीदाराच्या राहूटीजवळ पन्नासवर सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. दोनशेवर सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून त्याची कत्तल करणे हे काही एक-दोन दिवसांचे काम नाही. तस्करांच्या सात ते आठ जणांच्या टोळीने सतत आठ दिवस कुऱ्हाड चालवून या वृक्षांची कत्तल केली असावी. कत्तलीतील लाकडे ही १०० ते १२० सेंटीमिटर गोलाईची आणि सुमारे २० फुटाच्या उंचीची असावी हे थूटांवरून लक्षात येते. त्यामुळे या लाकडाची तस्करी करताना ट्रकचा वापर झाला आहे. ट्रकच्या चाकाच्या खुनाही राखीव वनाच्या हद्दीत त्याची साक्ष देत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रकरण उजेडात आणल्यानंतर हिवरी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते आणि कर्मचारी खडबडून जागे झाले. सुमारे १५ दिवस या प्रकरणाची चौकशी दडपून ठेवणाऱ्या आरएफओ मोहिते यांनी एकाच वेळी वृक्ष चोरीचे पीओआर न फाडता वेगवेगळ्या दिवशी ते फाडायला लावले. तसेच प्रकरण अंगलट येवू नये म्हणून वरिष्ठांच्या डोळ्यात धुळफेक करीत ही घटना दरोडा सदृश्य असल्याचे दर्शविण्याचा खटाटोप चालला आहे. दरोडा हा अचानक पडत असतो. त्यातही एकाचवेळी मुद्देमाल लुटून नेला जातो. सागवान वृक्षांच्या बाबतीत हे शक्य नाही. त्यामुळे वरिष्ठ वनाधिकारीही त्यांचा हा युक्तीवाद मोडीत काढीत असल्याचे खुद्द वनवर्तुळातून सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)