शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

थोरांचे पुतळे होर्डिंगच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:07 IST

थोर पुरुषांच्या चरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले. परंतु शहरात थोरांच्या पुतळ्यांना आता प्रसिद्धीलोलूप तथाकथित समाज सेवकांच्या होर्डिंगचा गराडा पडला आहे. यामुळे पुतळ्यासह शहराचेही विद्रूपीकरण होत असताना नगरपालिका मात्र दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देपुसद नगर पालिकेचे दुर्लक्ष : माळी समाज आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : थोर पुरुषांच्या चरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले. परंतु शहरात थोरांच्या पुतळ्यांना आता प्रसिद्धीलोलूप तथाकथित समाज सेवकांच्या होर्डिंगचा गराडा पडला आहे. यामुळे पुतळ्यासह शहराचेही विद्रूपीकरण होत असताना नगरपालिका मात्र दुर्लक्ष करीत आहे.पुसद नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून बसस्थानक चौकात थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. मात्र सध्या या पुतळ्याच्या अवतीभवती मोठे होर्डिंगस लावण्यात आले आहे. तर पुतळ्यासमोरच फुटपाथवर फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या सर्व गर्दीत महात्म्याचा पुतळाच दिसेनासा होतो की काय अशी भीती सुज्ञ नागरिकांना वाटू लागली आहे. त्यामुळे समाज भावना दुखावल्या जात असून नगरपालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.महात्मा फुले पुतळ्यासमोरील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे तसेच या ठिकाणी बॅनर लावण्यावर बंदी आणावी, अशी मागणी येथील माळी समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, जिल्हाधिकारी, आमदार मनोहरराव नाईक, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा आदींना निवेदनही देण्यात आले आहे.यासंदर्भात प्रशासनाकडे यापूर्वीही वेळोवेळी अर्ज देण्यात आले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नगरपरिषद पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवून यापुढे कोणतेही बॅनर लावू नये, अशी मागणी होत आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा माळी समाज संघटनेचे आत्माराम जाधव, गजानन इंगळे, संदीप भोने, डॉ. रोहित राऊत, मुरलीधर जाधव, राजेश जाधव, शुभम इंगोले, राहुल काशीनंद, गजेंद्र मोरे, सुनील गवळी, देविदास झरकर, संजय भोने, प्रा.धनंजय कोठाळे, दीपक चिपडे आदींनी दिला.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण