शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही मुक्ततेसाठी राज्यभर प्रबोधन

By admin | Updated: June 13, 2014 00:33 IST

एचआयव्हीमुक्त भारत निर्माण व्हावा, यासाठी औरंगाबाद येथील आदेश आटोटे या तरुणाने मोटरसायकलवरून शहरी तथा ग्रामीण भागात जनजागरण सुरू केले आहे.

यवतमाळ : एचआयव्हीमुक्त भारत निर्माण व्हावा, यासाठी औरंगाबाद येथील आदेश आटोटे या तरुणाने मोटरसायकलवरून शहरी तथा ग्रामीण भागात जनजागरण सुरू केले आहे. २० मे रोजी त्याचे हे अभियान सुरू असून आदेश नुकताच यवतमाळात दाखल झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एचआयव्ही एड्सबाबत तो जनजागरण करणार आहे.

मूळचा मुर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर येथील रहिवासी असलेला आदेश मोटरसायकलने संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार आहे. २० मे रोजी सुरू झालेल्या या अभियानाचा १ डिसेंबर जागतिक एड्स दिनी औरंगाबाद येथे समारोप होणार आहे. आदेश आटोटे हा संगीत शिक्षक आहे. त्याने इंदोर येथील भैय्यू महाराजांच्या आश्रमात २००८ मध्ये भजनसंध्या या कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते. या कार्यक्रमामध्ये पुणे येथील एचआयव्हीग्रस्त लहान बालकेसुद्धा सहभागी झाली होती. एचआयव्हीग्रस्त बालकांच्या वाट्याला आलेल्या वेदना पाहून आदेश हळहळला. त्याच्या मनातील कलावंत त्याला स्वस्थ बसू देईना.

मानवीय दृष्टिकोनातून त्याने एचआयव्हीग्रस्त बालकांच्या बालगृहात सेवासुद्धा दिली. हे काम करीत असतानाच एचआयव्हीबाबत जनजागरण करून संपूर्ण देश एचआयव्हीमुक्त व्हावा, हा संकल्प त्याने केला. यासाठी जनजागरण यात्रेचे स्वयंस्फूर्तीने आयोजन केले. सहा वर्षाच्या कालावधीत एचआयव्ही या जीवघेण्या आजाराने १२३ जणांचा झालेला मृत्यू त्याने अनुभवला. रुग्णांच्या बाबत समाजामध्ये असलेले गैरसमज दूर व्हावे म्हणून आदेश आटोटे याने गावागावात प्रचार अभियान सुरू केले. सुरुवातीला सायकलद्वारे प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या अभियानामागील प्रामाणिक सामाजिक उद्देश लक्षात घेता त्याच्या मित्राने मोटरसायकलद्वारे प्रचार करण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हेतर लोकवर्गणीतून आदेशला मोटरसायकल घेवून देण्यात आली. त्याच्या या कार्यात कचरा उचलणाऱ्या महिलांनीही आपल्या श्रमातील रक्कम दिली. औरंगाबाद, जालना, देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा, अकोला, चंद्रपूर आदी शहरांमध्ये त्याने एड्सबाबत असलेल्या भ्रामक कल्पना व समजुतींवर आपल्या वाणीतून प्रकाश टाकला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात तो आता जनजागरण करणार आहे. (शहर प्रतिनिधी)