शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ

By admin | Updated: November 12, 2016 01:49 IST

नगरपरिषद निवडणुकीच्या शुक्रवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुसदमध्ये ४४,

नगरपरिषद : पुसद ४४, दिग्रस १८ आणि उमरखेडमध्ये १६ उमेदवारांची माघार पुसद/दिग्रस/उमरखेड : नगरपरिषद निवडणुकीच्या शुक्रवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुसदमध्ये ४४, दिग्रसमध्ये १८ आणि उमरखेडमध्ये १६ जणांनी नगरसेवकाच्या रिंगणातून माघार घेतली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी या तीनही नगरपरिषदांमध्ये २१ जण रिंगणात आहे. पुसदमध्ये नगराध्यक्ष पदाची तिरंगी लढत होत असून उमरखेडमध्ये आठ आणि दिग्रसमध्ये १० उमेदवार रिंगणात आहेत. पुसदमध्ये ११७ उमेदवार पुसद नगरपरिषदेच्या २९ नगरसेवकांसाठी १६१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत ४४ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता १४ प्रभागात ११७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत २१ जणांनी उमेदवारी मागे घेतली होती. आज नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २४ जणांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे उमेदवारी मागे घेणाऱ्यांची संख्या ४४ झाली आहे.दिग्रसमध्ये ९८ उमेदवार दिग्रस नगरपरिषदेच्या २४ नगरसेवकांच्या जागांसाठी ११६ नामांकन दाखल झाले होते. त्यापैकी १६ जणांनी नामांकन मागे घेतल्याने ९८ उमेदवार कायम राहिले आहेत. माघार घेणाऱ्यांमध्ये प्रभाग क्र. १ अश्विन चौधरी, राहुल राठोड, प्रभाग १ किरण लाखेवार, प्रभाग ४ माणिक मुनेश्वर, प्रभाग ५ अ.खालीक म.अयुब शेख, प्रभाग ६ एजाज अ.हक, अ.हक बशीर, प्रभाग ७ दीपा देवघरे, प्रभाग ८ फजल खान गुलाब खान, प्रभाग ९ तुकडी बेगम शे.करीम नागपुरे, अमिनाबी मुबारक अली मलनस, प्रभाग ९ किशोर मारोती कदम, प्रभाग क्र. ११ शे.करीम शे.हसन नागपुरे, सलीम जुम्मा दादूवाले, नासीर अहमद शे.बंदू, प्रभाग ११ जैतूनबी शे.मुसा नागपुरे, करिश्मा इरफान नवरंगाबादे, रेहनाबानो नासीर यांचा समावेश आहे. आता निवडणुकीच्या खऱ्या प्रचाराला प्रारंंभ होणार असून २७ नोव्हेंबरपर्यंत रणधुमाळी कायम राहणार आहे. उमरखेडमध्ये उमेदवारांची शंभरीउमरखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या २४ जागांसाठी ११६ नामांकन दाखल झाले होते. त्यापैकी अखेरच्या दिवसापर्यंत १६ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता उमरखेड नगरपरिषदेच्या रिंगणात १०० उमेदवार भाग्य आजमावित आहे. नगराध्यक्ष पदासाठी उमरखेडमध्ये दहा उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी दोन जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे भारत खंदारे, भाजपाचे नामदेव ससाने, शिवसेनेचे पुरुषोत्तम काळे, प्रहारचे राजू गायकवाड, एमआयएमचे अ‍ॅड. शंकर मुनेश्वर, बसपाचे संजय खंदारे यांच्यासह दोन अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. उमरखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली ंआहे. एमआयएमने नगराध्यक्षासह १२ नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात ठेवले आहे. त्याचा फटका नेमका कुणाला बसणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे. सध्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. (लोकमत चमू)