सव्वा कोटींचे काम : कंत्राटदार काम सोडून पसारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेतून केवळ राजकीय ठेकेदारांचे अथवा पक्ष कार्यकर्त्यांचे आर्थिक पुनर्वसन केले जात असल्याने कामाला सुरुंग लागला आहे. सेवानिवृत्त अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या एका कंत्राटदाराने नाला सरळीकरणाचे सव्वा कोटींचे काम घेऊन अर्ध्यावर सोडून दिले आहे. दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथे जलयुक्त शिवार योनजेतून नागोबा नाला सरळीकरणासह इतरही कामे प्रस्तावित आहे. या कामासाठी एक कोटी २१ लाखांची तरतूद आहे. ई- निविदेचा सोपस्कार पूर्ण करून पुसद येथील एका सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या संस्थेला हे काम देण्यात आले. इस्टीमेटप्रमाणे यामध्ये तीन मीटर खोली आणि २०० मीटर लांबीचे काम आहे. या ठेकेदाराने जेसीबी मशीनद्वारे २५ व २६ मे रोजी दोन दिवस काम करून अर्धवट सोडून दिले. शेत शिवारातून त्याने मशीनही परत नेल्या आहेत. अर्धवट कामामुळे पावसाचे पाणी शेतात शिरण्याची भिती असल्याने शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला याबाबत विचारणा केली. त्याने सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक असल्याचे सांगितले. आता हे अर्धवट काम सोडून पळालेल्या ठेकेदाराची शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. राजकीय पाठबळ मिळत असल्याने जलयुक्त शिवाराच्या कामाला सुरूंग लावला जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. कृषी विभागाची यंत्रणा ही राजकीय पुढाऱ्यांच्याच दावणीला बांधली गेली असून त्यांच्या मर्जीविरूद्ध काम करण्यास तयार नाही. झालेल्या कामाची तांत्रिक दृष्ट्या उपायेगिताही तपासली जात नाही. तुपटाकळी येथील नाला सरळीकरण कामाची अजय ठाकरे या शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आता पारदर्शक प्रशासनाची हमी देणारे जिल्हाधिकारी या प्रकरणत कोणती भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.माती काम असून त्यावर ब्लास्टींगसाठी आर्थिक तरतूद नाही. या कामात काळा दगड लागल्याने इस्टीमेटप्रमाणे काम करणे शक्य नाही. झालेल्या कामाचेच बील ठेकेदाराला देण्यात येईल. -अर्जुन जाधव, तालुका कृषी अधिकारी, दिग्रस
जलयुक्तच्या नाला सरळीकरणाला सुरूं ग
By admin | Updated: June 9, 2017 01:43 IST