शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड येथे साकारणार तारांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:18 IST

अनेक मोठ्या शहरांप्रमाणेच आता उमरखेडमध्ये तारांगण उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. अनेक मोठ्या शहरांमध्ये अंतराळ अभ्यासासाठी तारांगण उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालिकेची माहिती : जगदंबा देवीच्या पायथ्याशी २० कोटींच्या निधीतून पर्यटन क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अनेक मोठ्या शहरांप्रमाणेच आता उमरखेडमध्ये तारांगण उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.अनेक मोठ्या शहरांमध्ये अंतराळ अभ्यासासाठी तारांगण उभारण्यात आले आहे. आता उमरखेडमध्येही अशाच प्रकारचे पाच कोटी रुपयांचे तारांगण उभारले जाणार आहे. त्यासाठी शासनस्तरावरून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून निविदासुद्धा काढण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तारांगण उभारणीसाठी ४-के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ३५ फुटांचे अर्धगोलाकार घुमटाचे हे तारांगण वाताणुकुलीत राहणार आहे. या तारांगणात ७० जणांची आसनक्षमता राहणार आहे. अंतराळात बसून निरीक्षण करीत असल्याचा अनुभव येण्यासाठी ३६०-१८० अंशांचे घुमटामध्ये डोळ्यांना कोणतेही उपकरण न लावता त्रिमितीय रूपात अंतराळातील घडामोडी बघता येणार आहे. परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यांना अंतराळ अभ्यास करण्यास मदत मिळणार आहे, असे नगराध्यक्ष नामदेव ससाने यांनी सांगितले.पालिकेने शहर विकासाची अनेक कामे पूर्णत्वास नेली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला जात असल्याचे नितीन भुतडा यांनी सांगितले. विकास कामांसाठी पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. जगदंबा देवीच्या पायथ्याशी असलेल्या अविकसित जागेत सुमारे २० कोटी रुपये खर्च करून पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला.पत्रकार परिषदेला नगरसेवक राजू जयस्वाल, दिलीप सुरते, प्रकाश दुधेवार आदी उपस्थित होते.४० फुटांच्या मनोऱ्यावर दुर्बिनरात्री अंतराळ निरीक्षणासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी ४० फूट उंच मनोºयावर संगणकीय अत्याधुनिक दुर्बिन लावली जाणार आहे. यामुळे आकाशातील ग्रह, तारे, विविध घटकांचे निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय जगदंबादेवी पायथ्याशी आरक्षण क्र. ५ वर पिकनिक स्पॉट विकसित केला जाणार आहे.