शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुलांच्या पाठीशी उभे राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:33 IST

पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. त्यासाठी मुलांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे यांनी केले.

ठळक मुद्देआकाश चिकटे : घाटंजी येथे उलगडला हॉकीपटूचा प्रवास

ऑनलाईन लोकमतघाटंजी : पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. त्यासाठी मुलांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे यांनी केले.येथील शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रा. राजू तोडसाम होते. नगरपरिषद उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, बाजार समती सभापती अभिषेक ठाकरे, तहसीलदार गजानन हामंद, ठाणेदार भावसार, उपअभियंता विनायक ठाकरे, डॉ. अरविंद भुरे आदी मान्यवर उपस्थित होते. राजे छत्रपती सामाजिक संस्था व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मूळचे यवतमाळचे आणि भारतीय हॉकी संघाचे गोलरक्षक आकाश चिकटे यांना यंदाचा ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांनी आपली जडणघडण उलगडताना आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या आईवडिलांना असल्याचे सांगितले.आमदार राजू तोडसाम म्हणाले, आकाश चिकटेसारखे खेळाडू जिल्ह्यासाठी भूषणावह आहेत. प्रत्येकाने शिवरायांचे संस्कार अंगीकारून समाज व राष्ट्राच्या विकासात हातभार लावावा. पहिल्या पर्वात प्रा. संतोष दरणे यांचे व्याख्यान झाले. सिद्धार्थ खिल्लारे यांच्या हास्यसम्राट कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. प्रास्ताविक व संचालन राजेश उदार यांनी केले. आभार दीपक महाकुलकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रफुल्ल अक्कलवार, राहुल खर्चे, अनिल मस्के, राजू गिरी, प्रमोद टापरे यांनी परिश्रम घेतले.एमपीएससीतील गुणवंतांचा गौरवछत्रपती शिवराय सामाजिक सभागृहाच्या संरक्षक भिंतीसाठी आमदार राजू तोडसाम यांनी पाच लाखांचा निधी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला. त्याबद्दल उत्सव समितीच्या वतीने आमदार तोडसाम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील एमपीएससी परीक्षेतील गुणवंत विशाल भेदूरकर, आकाश जाधव, अतुल वानखडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.