शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कर्मचाऱ्याने जोपासला चलन संग्रहाचा छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:12 IST

छंद मग कोणताही असो, तो पूर्ण करेपर्यंत जीवाला आराम नसतो. नेर न्यायालयात कार्यरत विजयकुमार झ्यंबकलाल द्विवेदी यांनाही एक अनोखा छंद जडला आहे. देशविदेशातील विविध नाणी आणि नोटा गोळा करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे.

ठळक मुद्देदेशविदेशातील विविध नाणी आणि नोटा गोळा करण्याचा छंद

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : छंद मग कोणताही असो, तो पूर्ण करेपर्यंत जीवाला आराम नसतो. नेर न्यायालयात कार्यरत विजयकुमार झ्यंबकलाल द्विवेदी यांनाही एक अनोखा छंद जडला आहे. देशविदेशातील विविध नाणी आणि नोटा गोळा करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे.यवतमाळ येथील रहिवासी असलेले विजयकुमार द्विवेदी यांना मागील ३१ वर्षांपासून देशविदेशातील चलन गोळा करण्याचा छंद जडला. एक पैशापासून ते दोन हजार रुपयापर्यंतच्या नोटा त्यांनी गोळा केल्या. भारतीय रिझर्व बँकेने जेवढ्या वेळा नोटा बदलविल्या तेवढ्या बदललेल्या नोटा त्यांच्याकडे आहेत. तसेच २६० प्रकारची विविध नाणी त्यांच्याकडे आहे. एक रुपयापासून हजार रुपयांपर्यतच्या नोटा कशा बदलल्या याची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. नेपाळ, भुतान, सौदीअरब, झिम्बाब्वे, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशीया, चीन यासह विविध देशातील चलन व नाण्यांचा अपूर्वसग्रह त्यांच्याकडे आहे.पाच रुपयांचे नाणे आतापर्यंत ४६ वेळा बदलले आहे. दहा रुपयांच्या नाण्यात दहा वेळा बदल झाल्याची माहिती विजयकुमार यांनी दिली. नाणी व नोटा गोळा करण्याचा छंद जपताना ते बऱ्याच देशात फिरले. सरकारी नोकरी लागण्यापूर्वी ते राजस्थान येथे खासगी देशविदेश व्हीसा विभागात कार्यरत होते. ही कामे करत असतानाच त्यांना हा अनोखा छंद जडला. यासाठी त्यांना पत्नी रेखा यांनीही सतत प्रोत्साहित केले. वडिलांच्या या चलन सग्रहाच्या छंदाला मुलगा अक्षय आणि मुलगी निक्की हेसुध्दा हातभार लावतात.नाणी आणि नोटा गोळा करण्याशिवाय विजयकुमार यांना विविध देशातील पोष्टाच्या तिकिटा गोळा करण्याचाही छंद आहे. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनातून विजयकुमार यांच्या या छंदाची लोकांना ओळख होते. अलीकडेच नेर येथे झालेल्या प्रदर्शनात विजयकुमार यांनी गोळा केलेली नाणी आणि नोटा ठेवण्यात आल्या होत्या.