शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:12 IST

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने गुरुवारी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर निदर्शने

प्रलंबित मागण्या : अनोख्या आंदोलनाने वेधले नागरिकांचे लक्षलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने गुरुवारी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यवतमाळ येथील आर्णी मार्गावरील एसटी कार्यशाळेसमोर कर्मचाऱ्यांनी आपला सदरा काढून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधले. एसटी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी व सातवा वेतन आयोग महागाई थकबाकीसह देण्यात यावा, नियमबाह्य व कामगार विरोधी जाचक परिपत्रक रद्द झाले पाहिजे. शिस्त व अपिल कार्यपद्धतीचा दुरुपयोग बंद व्हावा, वेळापत्रकामधील त्रूटी दूर कराव्या, तसेच करार कायदे परिपत्रकाचा भंग करून आकसपूर्ण घेतलेले निर्णय रद्द करा, चालक कम वाहक या धोरणाचा फेरविचार करा, महिला कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा पुरवाव्या, चार वर्षांपासून न मिळालेले गणवेशाचे कापड त्वरित देण्यात यावे, चालक-वाहक विश्रांतीगृहामध्ये सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत पास देण्यात यावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्ती वेतन देण्यात यावे आदी प्रमुख मागण्या एसटी कामगारांनी केल्या. या आंदोलनाची दखल न घेतल्यास चक्काजामसारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात विभागीय सचिव सदाशिव शिवणकर, विभागीय अध्यक्ष राहुल धार्मिक, अरुण वाघमारे, प्रकाश देशकरी, सलाउद्दिन शेख, प्रवीण बोनगीनवार, उगले, विलास डगवार, इंचोळकर, पंधरे, नितीन चव्हाण, दिगांबर गुघाणे, प्रीतम ठाकूर, गोविंद, योगेश रोकडे, अंकुश पाते, मुंजेकर, सलीम शहा, सै. इरफान, प्रवीण राऊत, शेख लाल, अरुण काळे, मो. इस्तीयाक, नाईकर, उत्तरवार, गणेश राठोड, रंजना किरणापुरे, उत्तम पाटील, डी.के. भगत, भानारकर, रतन पवार, प्रमोद माथने आदींसह असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते.