शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ टाकणार फेऱ्यांचा टाॅप गिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 05:00 IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असला तरी त्यातील काही कर्मचारी कामावर येत आहे. एसटीला सध्या चालक आणि वाहकांची आवश्यकता आहे. ही संख्या गरजेइतकी वाढत नसल्याने खासगी कंपनीकडून चालक उपलब्ध करून घेतले जात आहे. यवतमाळ विभागाकरिता ७५ चालक उपलब्ध होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटीच्या फेऱ्या वाढविण्यासाठी महामंडळाकडून खासगी चालकांची भरती केली जात आहे. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढणार आहे. सध्या असलेली चालकांची टंचाई कमी होऊन आणखी बसफेऱ्या सोडल्या जाणार आहे. सद्यस्थितीत ८५ चालकांच्या भरवशावर ७५ ते ८० बसेस मार्गावर धावत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असला तरी त्यातील काही कर्मचारी कामावर येत आहे. एसटीला सध्या चालक आणि वाहकांची आवश्यकता आहे. ही संख्या गरजेइतकी वाढत नसल्याने खासगी कंपनीकडून चालक उपलब्ध करून घेतले जात आहे. यवतमाळ विभागाकरिता ७५ चालक उपलब्ध होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. कार्यशाळा कर्मचारी, पदोन्नती मिळालेले चालक यांचीही सेवा चालक म्हणून घेतली जात आहे. येत्या आठवडाभरात खासगी ७५ चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हाभरातील सर्व आगारांना हे चालक पुरविले जाणार आहे. पुसद आणि उमरखेड आगारातून नाममात्र बसफेऱ्या सोडल्या जात आहे. त्यामुळे या भागातील ग्रामीण नागरिकांची प्रवासासाठी मोठी गैरसोय सुरू आहे. बसफेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित नसल्याने नागरिक बसस्थानकावर येण्यास टाळाटाळ करत असल्याचेही चित्र दिसत आहे. किमान तासाभराच्या फरकाने फलाटावर बसेस लागाव्या, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही होत आहे. परंतु चालक उपलब्ध नसल्याचे कारण महामंडळाकडून सांगितले जाते.

सध्या सायंकाळी ६ नंतर होतात फेऱ्या बंद-  बसस्थानकावरून संध्याकाळी ६नंतर बसफेऱ्या सोडल्या जात नाही. अनेक नागरिक बसस्थानकावर येऊन परत जातात. नाईलाजाने त्यांना खासगी बसने प्रवास करावा लागतो. बस सोडण्याच्या या वेळाही वाढविल्या जाव्या, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. ग्रामीण भागातून शहरात प्रामुख्याने वैद्यकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना गावी जाण्यासाठी कुठलीही साधने नाहीत.

वाहकांचीही नियुक्ती करणा

बसफेऱ्या सुरू असल्या तरी तिकीट काढण्यासाठी वाहकांची टंचाई आहे. सद्यस्थितीत स्पाॅट बुकिंग केली जात असल्याने मार्गात मिळणारे प्रवासी घेतले जात नाही. केवळ बसस्थानकाच्या ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार सुरू आहे. बसमध्ये जागा असूनही प्रवासी घेतले जात नाही. वाहक असल्यास हा प्रश्नही निकाली निघणार आहे. 

यवतमाळ विभागाला ७५ खासगीचालक नियुक्तीची परवानगी आहे. हा कोरम पूर्ण झाल्यानंतर बसफेऱ्या वाढविल्या जाईल.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप