शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

एसटी प्रवाशांची सुरक्षा ‘स्टेअरिंग फ्री’ने धोक्यात

By admin | Updated: January 18, 2015 22:49 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील अनागोंदी प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. बसचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेले स्टेअरिंग फ्री होण्याच्या प्रकारामुळे

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील अनागोंदी प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. बसचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेले स्टेअरिंग फ्री होण्याच्या प्रकारामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेली १५ दिवसात झालेल्या गंभीर घटनेनंतरही या प्रकाराकडे दुर्लक्ष सुरू आहे. प्रवाशांचे बळी गेल्यानंतरच यात सुधारणा होईल काय, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. जवळपास बसच्या स्टेअरिंगमध्ये प्ले असून जामही आहे. काही बसेसचे स्टेअरिंग तर फ्री झालेले आहे. त्यामुळे चालकांना वाहन हाकताना गंभीर बाबींना सामोरे जावे लागते. मार्गातील बसचे स्टेअरिंग पूर्णपणे फ्री झाल्यास चालकाचे नियंत्रण सुटून बस वाट सापडेल तिकडे धावते. यात अपघात होतो. बहुतांश वेळी चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळतात. मात्र काही बाबतीत घटना टळणे अशक्य असते. आयुष्य संपलेली वाहनेही रस्त्यावर धावतात. तरीही अशा बसेस मार्गावर सोडल्या जातात. आर्णी मार्गावर शहरालगत एका बसला अपघात झाला. या बसच्या चालकाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही दिवसांपूर्वी ९८६५ या क्रमांकाची बस अकोलाबाजारजवळ उलटली. यात काही प्रवासी जखमी झाले होते. हा अपघात स्टेअरिंग फ्री झाल्यामुळेच घडल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. अपघातानंतर कारण शोधण्याचे सोपस्कार महामंडळाच्या कार्यशाळा विभागाने पार पाडले. या अपघाताला चालकच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला. खड्डा चुकविता न आल्याने अपघात घडल्याचे मत त्यांनी नोंदविले. वास्तविक कुठलेही रस्ते गुळगुळीत नाही. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे. मग सर्वच बसला अपघात का होत नाही, असा प्रश्न चालकांमधून उपस्थित केला जात आहे. यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची चूक झाकण्यासाठी अशा घटनांमध्ये चालकांचा बळी दिला जात असल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)