शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘एसटी’ महामंडळाच्या दुकानांनी करार मोडला

By admin | Updated: June 18, 2016 01:57 IST

उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांना परिसरातच वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी एसटी महामंडळाने दुकान गाळे बांधले.

पसारा वाढविला : कारवाईचा सपाटा सुरूयवतमाळ : उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांना परिसरातच वस्तू उपलब्ध व्हाव्या यासाठी एसटी महामंडळाने दुकान गाळे बांधले. लिलावाद्वारे ही दुकाने चालविण्यासाठी देण्यात आली. ठरवून दिलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागा वापरात आणू नये, असा करार भाडेधारकांशी करण्यात आला. मात्र त्यांनी कराराचा भंग करत अतिक्रमण केले आहे. राज्यभरातील आगारांमध्ये एकूण ७६५ जणांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या अतिक्रमणाने होणारा त्रास लक्षात घेता महामंडळाने कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. बसस्थानकाचा आवार आणि बाह्य भागामध्ये महामंडळाने दुकान गाळे काढले आहेत. गाळे देताना करार करण्यात आला आहे. त्यामध्ये ठरवून दिलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागा वापरली जावू नये, हा प्रमुख मुद्दा आहे. हॉटेल, बुक स्टॉल, रसवंती, पानठेला, स्टेशनरी आदी प्रकारची दुकाने या गाळ्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. काही गाळेधारकांनी कराराचे उल्लंघन करत अतिरिक्त जागा व्यापली आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना होणारा त्रास आणि महामंडळाच्या बसेसच्या चालक-वाहकांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे किती ठिकाणी गाळेधारकांनी अतिक्रमण केले याची तपासणी करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी विनित अग्रवाल यांनी काढले. या आदेशानुसार राज्यभरात असलेल्या बसस्थानकावरील दुकान गाळ्यांची तपासणी करण्यात आली. यात ७६५ लोकांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. करारात ठरवून दिलेल्या जागेपेक्षा किती तरी अधिक जागा त्यांनी वापरात घेतल्याची बाब पुढे आली. वाढलेले अतिक्रमण तत्काळ काढावे, शिवाय अतिरिक्त जागेची रक्कम वसूल करावी, असे आदेश मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी काढले. या आदेशावरून राज्यभरातील अतिक्रमण काढण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. (वार्ताहर)