१२ जण जखमी : धामणगाव बायपासवरची घटना यवतमाळ : शहरातील धामणगाव बायपासवर भरधाव ट्रकने एसटीला धडक दिली. ही घटना सकाळी ९.३० वाजता घडली. यात १२ जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यवतमाळ आगाराची बस एम.एच४०-एन-८६६१ ही धामणगावकडे जात असताना नागपूर येथून बायपासने अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकने एसटीला मधोमध धडक दिली. सुर्दैवाने वेळेत ब्रेक लागल्याने मोठी हानी टळली. मात्र यात १२ जण जखमी झाले. त्यामध्ये रेखा माणिक मातकर (३५), वृषाली मातकर (१४) रा. कुऱ्हा ता. घाटंजी, पांडुरंग दिवरे (६५), माला कृष्ण दिवरे (४०), वैष्णवी कृष्ण दिवरे (२०), रेखा दिवरे (३६), लक्ष्मण दिवरे (६०), सिद्ध लक्ष्मण दिवरे (४२) सर्व रा. भांबराजा, मनीषा शैलेष पुरी (३५) रा. मुलकी यवतमाळ, नागोराव भोयर (७५) रा. परसोडी ता. बाभूळगाव, विनोद जाधव (३०) रा. देऊरवाडी ता. आर्णी, नेत्रा जय देशमुख (२५) रा. वैद्यनगर, यवतमाळ असे जखमींची नावे आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी ट्रक चालक शिवकुमार परिहार रा. ग्वाल्हेर मध्यप्रदेश याला ताब्यात घेतले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
ट्रकची एसटी बसला धडक
By admin | Updated: June 19, 2016 02:19 IST