शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या बंदोबस्तानंतरच पथक परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:51 IST

वाघाने सात जणांचा बळी घेतल्याने राळेगावसह तीन तालुक्यातील नागरिक कमालीचे दहशतीखाली आहे. या परिसरातील वन्यप्राणीग्रस्तांची बैठक सखी (ता.राळेगाव) येथे घेण्यात आली.

ठळक मुद्देसखी येथे वन्यप्राणीग्रस्तांची बैठक : शेतकरी स्वावलंबन मिशन अध्यक्षांचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघाने सात जणांचा बळी घेतल्याने राळेगावसह तीन तालुक्यातील नागरिक कमालीचे दहशतीखाली आहे. या परिसरातील वन्यप्राणीग्रस्तांची बैठक सखी (ता.राळेगाव) येथे घेण्यात आली. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी या बैठकीला मार्गदर्शन करताना नागरिकांना दिलासा दिला. वन्यप्राण्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असे तिवारी यांनी यावेळी सांगितले.वाघाला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. संपूर्ण परिसर वाघमुक्त केल्याशिवाय ही मोहीम थांबणार नाही, असे ते म्हणाले. आमदार डॉ.अशोक उईके यांनी हा गंभीर प्रश्न सरकार दरबारी लावून धरला आहे. सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सखी येथील -- कोवे याला वाघाने ठार मारले. त्याच्या कुटुंबाला वन विकास महामंडळाकडून आठ लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. तशी माहिती पांडुरंग कोवे यांनी यावेळी दिली.सखी परिसरातील नागरिक वाघाच्या दहशतीखाली आहे. शेतकरी, शेतमजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि शोधमोहिमेचा आढावा घेण्यासाठी किशोर तिवारी यांनी सखी येथे भेट दिली. यावेळी अशोक केवटे, विजय तेलंगे, मानद वन्यजीव रक्षक डॉ.आर.एन. विराणी, उपवनसंरक्षक के.एम. अभर्णा, एफडीसीएमचे व्यवस्थापक पुनसे, जानराव ठाकरे, भोनूजी टेकाम, अंकित नैताम, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, आरोग्य अधिकारी डॉ.पवार, गटविकास अधिकारी खेडकर आदी उपस्थित होते.समस्यांचे निराकरण करण्यासाठीच्या चर्चेत रघुनाथ मेश्राम, गजानन ढाले, दत्ता देशमुख, रामरावजी पुरके, अनिल सुरपाम आदी सहभागी झाले होते. वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे अनेकजण वाघाचे बळी ठरत असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. सदर प्रकरणी जबाबदार अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे किशोर तिवारी यांनी यावेळी सांगितले.