शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गालगत टाकले ‘स्पेंट वॉश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

डिस्टलरी कारखान्याने दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ईटीपीची निर्मिती करणे अनिवार्य आहे. परंतु तालुक्यातील गुंज येथील एक प्लांट मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दरवर्षी भर पावसाळ्यात हे दूषित पाणी जागा मिळेल तेथे टाकले जात आहे. हेच दूषित पाणी नदी, नाल्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नदी व नाल्यातील जीवजंतुसुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. हे स्पेंट वॉश गुराढोरांच्या पिण्यात गेल्यास दगावण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्दे महागाव तालुक्यात आरोग्य धोक्यात : पर्यावरणालाही निर्माण झाला धोका

ज्ञानेश्वर ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : राष्ट्रीय महामार्गालगत ई-क्लास आणि ‘एनएएच’च्या हद्दीत दिवसाढवळ्या पर्यावरणाला हानिकारक स्पेंट वॉश सांडवा वाहत आहे. एका डिस्टलरी कारखान्याकडून अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा सांडवा वाहत आहे. मात्र, या संदर्भात पर्यावरण विभागाला कोणतेही सोयरसुतक नाही.डिस्टलरी कारखान्याने दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ईटीपीची निर्मिती करणे अनिवार्य आहे. परंतु तालुक्यातील गुंज येथील एक प्लांट मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दरवर्षी भर पावसाळ्यात हे दूषित पाणी जागा मिळेल तेथे टाकले जात आहे. हेच दूषित पाणी नदी, नाल्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नदी व नाल्यातील जीवजंतुसुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे. हे स्पेंट वॉश गुराढोरांच्या पिण्यात गेल्यास दगावण्याची शक्यता बळावली आहे.सबंधित डिस्टलरी कारखान्यावर पर्यावरण विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी जनभावना आहे. पर्यावरणाला घातक असलेले द्रव्य स्वरूपातील स्पेंट वॉश शासकीय ई-क्लास  आणि राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत टँकरच्या साहाय्याने टाकले जाते. गुंज परिसरात असलेल्या कारखान्यात उसापासून तयार होणाऱ्या मोल्यासिसपासून कच्या इथेनॉलची निर्मिती केली जाते. त्यापासून मोठ्या प्रमाणात अल्कोहोल व सॅनिटायझर तयार केले जाते. हे सर्व ज्वालाग्राही रसायन विविध केमिकल वापरून बनवले जाते. या मोल्यासीसचे रूपांतरण द्रव्य स्वरूपातील स्पेंट वॉशमध्ये होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.

हा खेळ किती दिवस?सध्या खरीप हंगाम सुरू असून, लागवडीची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात मजूर काम करीत आहेत. या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे मजुरांना काम करणेही कठीण झाले आहे. डिस्टलरीचा हा अतिरेक आणखी किती दिवस चालेल व किती लोकांचे बळी घेणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या संदर्भात सखोल माहिती घेऊन तक्रार असलेल्या ठिकाणी स्पेंट वॉश टाकणे त्वरित बंद करू. आम्ही मागणीनुसार शेतकऱ्यांना खत म्हणून त्यांची परवानगी घेऊन स्पेंट वॉश टाकत असतो. परंतु महामार्गालगत टाकण्यात आल्याबद्दल माहिती नाही.- रमेशकुमार शर्माजनरल मॅनेजर, डिस्टलरी प्लांट, गुंज

टॅग्स :environmentपर्यावरण