शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

बदलीपात्रच्या याद्यांना गती

By admin | Updated: April 2, 2017 00:21 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करण्यास गती दिली आहे.

जिल्हा परिषद : ज्येष्ठतेनुसार शोध सुरू, निर्णयात फेरबदलाची शक्यता यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करण्यास गती दिली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार याद्या तयार करण्यात येत असून सर्व नवीन पदाधिकारी पदारूढ झाल्यानंतरच यादी अंतिम होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत दरवर्षी बदलीचा हंगाम चांगलाच गाजतो. मागीलवर्षी शिक्षक बदल्यांवरून प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरूनही रणकंदन माजले होते. अनेकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यामुळे यावर्षीच्या बदली प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन पदाधिकारी, सदस्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच या बदल्या होणार आहे. शासनाने समुपदेशनाने बदली करण्यावर भर दिल्याने पदाधिकारी, सदस्यांच्या शिफारशींना आता पूर्वीसारखे महत्त्वही उरले नाही. राज्य शासनाने शिक्षक बदल्यांच्या निर्णयात यावर्षी सुधारणा केली आहे. त्यानुसार अवघड क्षेत्र आणि हे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र, असे दोनच भाग आता राहिले आहे. मात्र नेमके अवघड क्षेत्र कोणते, ते कसे ठरविणार, पेसाअंतर्गची सर्व गावे अवघड क्षेत्रात येणार काय, आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे. यामुळे बदली निर्णयात शेवटच्या क्षणापर्यंत आणखी फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तथापि सर्वच विभागांनी सध्याच्या शासन निर्णयानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार करण्यास सुरूवात केली आहे. सेवाज्येष्ठ शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे. त्यासाठी मुख्यालय, पंचायत समिती, केंद्र शाळा, एकाच शाळेतील ज्येष्ठता यादी बाबी विचारात घेऊन याद्या तयार केल्या जात आहे. त्यासाठी सर्वच विभागांनी खास तयारी सुरू केली आहे. मात्र शासनाकडून ऐनवेळी बदली धोरणात पुन्हा बदल होण्याची भीती सर्वच विभाग प्रमुखांना सतावत आहे. (शहर प्रतिनिधी)