शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा महसूलच्या कामाची गती वाढली

By admin | Updated: April 22, 2017 01:46 IST

उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कामांची गती वाढल्याने उपविभागातील दारव्हा आणि नेर तालुक्यातील रखडलेली कामे मार्गी लागली आहे.

वनहक्काच्या प्रकरणांना मान्यता : भूसंपादन प्रमाणपत्रे, विविध प्रकरणांचा जलद निपटारा दारव्हा : उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कामांची गती वाढल्याने उपविभागातील दारव्हा आणि नेर तालुक्यातील रखडलेली कामे मार्गी लागली आहे. त्यासोबतच दैनंदिन कामकाजातही हे कार्यालय पुढे असल्याचे दिसून येत आहे. भूसंपादन, वनहक्क, महसूल प्रकरणे, न्यायालयीन कामकाज, जातीसह इतर प्रमाणपत्रे यासह इतर सर्व कामांचा जलद गतीने निपटारा होत असल्याचे सांगितले जाते. सन २०१६ मध्ये या कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित होती. उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे रुजू झाल्यानंतर येथे कामाची गती वाढली. भूसंपादन विषयातील अत्यंत महत्त्वाचे असणारे वर्धा-नांदेड रेल्वेलाईनची दारव्हा तालुक्यातील २१ प्रकरणे सप्टेंबर २०१६ मध्ये प्रलंबित होती. या सर्व प्रकरणात संयुक्त मोजणीदेखील झाली नव्हती. याबाबत भूमिअभिलेख विभागाकडे पाठपुरावा करून सर्व प्रकरणात जेएमआर करून घेण्यात आला. २१ पैकी १८ प्रकरणात कलम १९ ची कार्यवाही करण्यात आली आहे. या भूसंपादन प्रकरणातून माहे मे २०१७ अखेर निवाडे व जून २०१७ अखेर भूधारकांना नवीन कायद्यातील तरतुदीनुसार मोबदला वाटपाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. महसूल, फौजदारी व न्यायालयीन प्रकरणातसुद्धा याच पद्धतीने कामकाज करण्यात येत आहे. महसूलमधील १२५ प्रलंबितपैकी ८० प्रकरणे निकाली काढण्यात आली. उर्वरित ४५ प्रकरणे जूनअखेरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहे. उपविभागीय दंडाधिकारी स्तरावर सीआरपीसी ११०, १७४ मुंबई पोलीस अ‍ॅक्ट कलम ५६, ५७ दारूबंदी कायदा कलम ९३ अंतर्गत प्रलंबित ९८ प्रकरणाचा निकाल देण्यात आला. सप्टेंबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत ५१८९ जातप्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली. तसेच लाडखेड येथे बळीराजा चेतना अभियानांतर्गत ५७९ जात प्रमाणपत्रे देण्यात आली. वनहक्क कायद्याचे अनुषंगाने दारव्हा २४ व नेर तालुक्यातील २१ प्रकरणाला जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळाली. (तालुका प्रतिनिधी)