शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:13 IST

मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची ही घोषणा हवेतच विरली.

ठळक मुद्दे‘सीएम’चे आश्वासन हवेतच : दोन वर्षे लोटली, मदत नाही

नरेंद्र नप्ते ।ऑनलाईन लोकमतमुडाणा : मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांची ही घोषणा हवेतच विरली. त्यात आता यंदा गारपीट आणि वादळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे.अडीच वर्षांपूर्वी ४ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री मदन येरावार आदींनी महागाव तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. नंतर सर्वेक्षण झाले. मात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी शासनाच्या नावाने ओरडत आहे.यावर्षी चार दिवस महागाव तालुक्याला अवकाळी व वादळी पावसाने झोडपले. गारपिटीने तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रबीतील गहू, हरभरा, भाजीपाला पिकासह फळांचे मोठे नुकसान झाले. राजुरा, बिजुरा, वडद, कोठारी, मुडाणा, काळी टेंभी, चिल्ली, पिंपळगाव, तिवरंग आदी गावांना तडाखा बसला. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.शासनासोबतच अस्माी संकटाने शेतकरी हादरून गेले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांचे अर्थकारण बिघडले आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.सरकारविरूद्ध रोषसरकार केवळ फोटो सेशन करण्यापुरतेच मदतीची घोषणा करते. प्रत्यक्षात मदत दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरूद्ध प्रचंड रोष आहे. सरकारमध्ये वाघ असल्याचे सांगितले जाते. मात्र शेतकरी उपेक्षित असल्याची प्रतिक्रिया जगदीश नरवाडे, उपसरपंच वसंतराव राठोड, संदीप खराटे आदींनी व्यक्त केली.पहिल्यांदा २ मार्च २०१५ रोजी गारपीट झाली. त्याचा अद्याप मोबदला मिळाला नाही. आताही मायबाप सरकारकडून कोणताच लाभ मिळण्याची शक्यता नाही. या सरकारच्या काळात नुकसान भरपाई मिळणार नाही.- विष्णू गांवडेशेतकरी