शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघाडणी

By admin | Updated: January 1, 2016 03:49 IST

जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत इंदिरा गांधी विकलांग योजनेची माहिती समितीचे अध्यक्ष केंद्रीय

यवतमाळ : जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत इंदिरा गांधी विकलांग योजनेची माहिती समितीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना विचारली. या अधिकाऱ्यांनी अशी योजना माहिती नसल्याचे उत्तर दिले. यावरून ना. अहीर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सभेत ग्रामीण पाणीपुरवठा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, रोजगार हमी योजना, कृषी विभागाच्या योजना यांचा सखोल आढावा घेण्यात आला. दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत विषयानुरुप आढावा घेतला जात असताना अधिकाऱ्यांकडून चक्क खोटी माहिती दिली जात होती. भाजपा आमदारांकडून या अधिकाऱ्यांची पोलखोल करण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार मदन येरावार उपस्थित होते. इंदिरा गांधी विकलांग योजना काय आहे, याची विचारणा ना.अहीर यांनी समाज कल्याण अधिकाऱ्याकडे केली. त्यांनी अशी कोणतीच योजना माहीत नसल्याचे सांगितले. जिल्ह्यात या योजनेतून केवळ २५७ अपंग, मतिमंद यांना लाभ दिला जातो. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अपंग व मतिमंदाचा आकडा फार मोठा आहे. तसेच या योजनेतून सिकलसेल ग्रस्तांनाही लाभ देण्याची सोय आहे. असे असतानाही त्याचा लाभ दिला जात नाही. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील ४० टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांची यादी तहसीलदारांकडे सादर करावी, सिकलसेल रुग्णांची यादी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने द्यावी, असे निर्देश दिले. या याद्या मिळताच इंदिरा गांधी विकलांग योजनेचा किती जणांना लाभ देता येतो त्यासाठी तहसीलदारांनी प्रयत्न करावे, असे सांगण्यात आले. अधिकारी वर्ग अपंग व मतिमंदांच्या योजना राबविण्यातही कुचराई करीत असल्याचे या बैठकीत उघड झाले. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या निधीअभावी रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील आमदारांनी निधी देण्याची तयारी दर्शविली. तशा योजनांची यादीच आमदारांकडे सादर करण्याचे निर्देश जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. आर्णी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामात कंत्राटदाराने तक्रार केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती देण्यात आली. याबाबत आमदार राजू तोडसाम यांनी विचारणा केली. यावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सदर प्रकरणात कंत्राटदाराने मंत्र्याकडे तक्रार केली. मंत्र्यांनी केलेल्या सूचनेवरून काम थांबविण्यात आल्याचे सांगितले. या आक्षेपावर अहवाल तयार करून मंत्र्यांकडे त्वरित पाठवावा, असे निर्देश देण्यात आले. सिकलसेल रुग्णांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड. राठोड यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)रंगरंगोटी व टाईल्ससाठी नळयोजना बंद४महागाव येथील नळ योजनेचे काम पूर्ण झाले असून ती का बंद आहे, अशी विचारणा आमदार राजेंद्र नजरधने यांनी केली. यावर जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याने अतिशय चिड आणणारे उत्तर दिले. रंगरंगोटी व टाईल्स बसविण्याचे काम थांबल्यामुळे योजना वर्षभरापासून बंद असल्याचे सांगितले. सुरुवातीला ही योजना सुरू असल्याचे उत्तर देत अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार नजरधने यांनी तुम्ही येथे भेट दिली काय असे विचारताच त्यांनी नुकताच प्रभार आल्याचे ठेवणीतील उत्तर समितीपुढे दिले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला सर्वांनीच धारेवर धरले.