शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

एसपींची जुगारावर धाड

By admin | Updated: July 16, 2015 02:25 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी बुधवारी स्वत: दुपारी पांढरकवडा रोड स्थित शारदा चौकातील जुगारावर धाड घातली.

शारदा चौक : तिघांना अटक, मालकासह तिघे पसार यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी बुधवारी स्वत: दुपारी पांढरकवडा रोड स्थित शारदा चौकातील जुगारावर धाड घातली. एसपींच्या या आक्रमक पावित्र्याने अवैध व्यावसायिक व त्यांंना छुपे संरक्षण देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. एसपींची ही धाड ‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणाम मानला जात आहे. शारदा चौकात गुड्डू ठाकूर याचा अनेक वर्षांपासून जुगार अड्डा चालविला जातो. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अखिलेशकुमार सिंह यांनी आपल्या काही निवडक कर्मचाऱ्यांसह थेट या जुगारावर धाड घातली. या धाडीत अलिम जाफर भाटे रा. तायडेनगर, विजय विठ्ठल गायकवाड, प्रेमसिंग मोतीसिंग ठाकूर या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्य व चार ते पाच हजाराची रोख जप्त करण्यात आली. या जुगाराचे मालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बबलू ठाकूर, सोनू भरोले व लखन बडोले या तिघांनासुद्धा आरोपी बनविण्यात आले आहे. या धाडीत एसपींनी स्वत: हा अड्डा उद्ध्वस्त केला. तेथील शेड तोडून टाकण्यात आले. खुद्द एसपींनी धाड घातल्याचे कळताच वडगाव रोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी सिंह यांनी जुगार व्यावसायिक, परिसरातील नागरिक व संबंधित पोलीस यंत्रणेची चांगलीच झाडाझडती घेतली. विशेष असे एसपींनी मंगळवारीच ठाणेदारांना अवैध धंदे बंद करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानंतरही शारदा चौकासह अन्य ठिकाणावरील जुगार अड्डे सुरू होते, हे विशेष. ‘लोकमत’ने बुधवारी ‘अप्सरा चौकातील जुगार मुंबईत गाजला’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊनच एसपींनी जुगार अड्ड्यांविरुद्ध थेट भूमिका घेतली. (जिल्हा प्रतिनिधी) स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षकांनी धाड घालून शारदा चौकातील जुगार पकडल्याने या बीटच्या जमादाराला निलंबित केले जाणार असल्याची माहिती आहे. वडगाव रोड ठाणेदार व यवतमाळच्या एसडीपीओवर नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. कारण त्यांच्या छुप्या संरक्षणाशिवाय जुगार अड्डे चालू शकत नाही, असे पोलीस वर्तुळातूनच दाव्याने सांगितले जाते. एसपींनी घाड घालून अवैध धंद्यांबाबत आपले धोरण पुन्हा स्पष्ट केले. जिल्ह्यात शंभरावर जुगार अड्डे आहेत. त्याची यादी सहज उपलब्ध हाईल. एकट्या यवतमाळ शहरातच १२ ते १५ मोठे अड्डे आहेत. हे अड्डे ठाणेदार आता खरोखरच बंद करतात काय आणि त्यासाठी आणखी किती वेळ घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरते.