शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

‘एसपीं’नी उघडली हातभट्टीविरूद्ध मोहीम

By admin | Updated: April 7, 2017 02:25 IST

खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच आता अवैध धंद्यांवर पाश आवळणे सुरू केले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या

लाखोंची दारू पकडली : मुरझडीपाठोपाठ दुसऱ्या दिवशी यावलीत धाड यवतमाळ : खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच आता अवैध धंद्यांवर पाश आवळणे सुरू केले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुरझडी शिवारात सलग दोन दिवस जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वत: धाडी टाकल्या. बुधवारी मुरझडी तलावाच्या काठावर सुरू असलेल्या हातभट्टी दारू कारखान्यावर स्वत: धाड टाकून त्यांनी आपल्या अनोख्या कार्यशैलीचा परिचय दिला. तसेच गुरुवारी यावली रोडलगत सुरू असलेल्या अवैध दारू गाळपावर धाड टाकली. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मुरझडी शिवारात तलावाच्या काठावर अनेक दिवसांपासून अवैध दारू गाळण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना मिळाली. त्यावरुन अत्यंत गोपनियता राखत बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी धाड मारली. घटनास्थळी मिळालेला एक लाख पाच हजार रुपयांचा मोहामाच व सडवा नष्ट करण्यात आला. यामध्ये कारखाना चालविणारे उत्तम तडमे व दिगांबर बन्सोड रा. दोघेही मुरझरी यांच्यावर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवून गुरुवारी यावली रोडलगत सुरू असलेल्या अवैध दारू गाळपावर धाड टाकली. या ठिकाणी चार दारू भट्टया आढळून आल्या. घटनास्थळी साठ प्लास्टिकचे ड्रम ज्यामध्ये २१०० लिटर मोहामाच व सडवा आढळून आला. टिनाच्या ९० पिंपात नऊशे लिटर दारू तसेच जंगलातून विनापरवाना आणलेले लाकूड असा एकूण एक लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी उत्तम तडसे रा. मुरझरी, संजय जिवने रा. भोसा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, एलसीबीचे पोलीस निरिक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पतंगे, टोळी विरोधी पथकाचे एपीआय प्रशांत गीते, पीएसआय संतोष मनवर, भीमराव सिरसाठ, साहेबराव राठोड आदींसह जमादार शिवहर जवने, गजानन डोंगरे, विशाल भगत, सचिन हुमने, प्रशांत हेडाऊ व ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, गणेश देवतळे, साहेबराव राठोड व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)‘एसपीं’च्या कारवाईने धाबे दणाणलेसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने बंद झाली. त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा आता हातभट्टीच्या दारूकडे वळविला आहे. त्यामुळे गावागावात दारूच्या भट्ट्या पेटायला लागल्या आहेत. याविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मोहीम उघडली आहे. खुद्द ‘एसपी’च प्रत्यक्ष दारूभट्टीच्या ठिकाणी धाड मारत आहेत. त्याठिकाणी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करीत आहेत. पोलीस अधीक्षक आपल्या शासकीय वाहनाऐवजी दुचाकीने धाडी घालत असल्याने कुणालाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. पोलीस अधीक्षकांच्या या अनोख्या मोहिमेमुळे दारू गाळणाऱ्यांचे तर धाबे दणाणले आहे, सोबतच त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांचीही पाचावर धारण बसली.