शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

सोयाबीन बियाणे विक्रेता निघाला ‘मास्टर मार्इंड’

By admin | Updated: May 30, 2015 02:28 IST

एरव्ही केवळ अनधिकृतचा संशय आला तरी बियाणे-खते व कीटकनाशकांचा साठा जप्त करणाऱ्या कृषी खात्याला महागाव तालुक्यातील एका मास्टर मार्इंड..

कारवाईला जागाच नाही : कृषी खात्याने हात टेकले, कायदेशीर पळवाटांचा अभ्यास, पथक रिकाम्या हाताने परतलेयवतमाळ : एरव्ही केवळ अनधिकृतचा संशय आला तरी बियाणे-खते व कीटकनाशकांचा साठा जप्त करणाऱ्या कृषी खात्याला महागाव तालुक्यातील एका मास्टर मार्इंड बियाणे विक्रेत्याने चांगलेच जेरीस आणले आहे. कायदेशीर कारवाईचा कोणताही मार्ग सापडत नसल्याने या विक्रेत्यापुढे कृषी खात्याने अखेर हात टेकले. जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने २७ मार्च रोजी वृत्तपत्रात बियाणे उपलब्ध असल्याची जाहिरात दिली. एकरी ३६ क्ंिवटल सोयाबीन उत्पादनाचा दावा त्याने या जाहिरातीत केला. शिवाय संशोधित बियाणे (वाण) आणि त्यावरील मार्गदर्शन उपलब्ध असल्याचे नमूद केले. राज्यात सोयाबीनचे सरासरी अधिकाधिक उत्पादन एकरी १५ क्ंिवटल आणि पश्चिम विदर्भात आठ ते दहा क्ंिवटल असताना थेट ३६ क्ंिवटलचा दावा पाहून कृषी विभागही आश्चर्यचकित झाला. शहानिशा करून कारवाई करण्यासाठी कृषी खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अमरावती येथील पथक गुरुवारी महागावात धडकले. यवतमाळ व महागावचे कृषी अधिकारीही या पथकासोबत होते. त्यांनी या बियाणे विक्रेत्याबाबत माहिती काढली. बोगस ग्राहकाद्वारे संपर्क करून पाहिला, तेव्हा त्याने बियाणे देण्याची तयारीही दर्शविली. तेव्हा तो २४ किलो सोयाबीन बियाण्याची एक बॅग १५० रुपयाला विकत असल्याचे आढळून आले. या विक्रीची खात्री झाली. मात्र कृषी अधिकाऱ्यांना त्याच्यावर कारवाईसाठी मार्गच सापडत नव्हता. कारण त्याने साध्या बॅगमधून बियाणे विक्री केली. त्यावर कुण्या कंपनीचे नाव अथवा एमआरपी नमूद नव्हती. पर्यायाने त्याला बियाणे विक्रीचा परवाना घेणेही बंधनकारक नव्हते, त्याच्या विरोधात थेट कुण्या शेतकऱ्याने रितसर तक्रार दाखल केली नव्हती किंवा त्याच्याबाबत फसवणूक झाल्याचे सांगणारेही कुणी पुढे आले नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या कलमान्वये कारवाई करावी याचा पेच निर्माण झाला. सिडस् कंट्रोल अ‍ॅक्स, इसी अ‍ॅक्ट, आयपीसी यापैकी कशातही तो बसत नव्हता. उलट कृषी खातेच शेतकऱ्यांना घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला देते, त्यानुसारच आपण घरगुती बियाण्याची गावातील शेतकऱ्यांना विक्री करीत असल्याचे या मास्टर मार्इंड विक्रेत्याने फोनवर सांगून कृषी अधिकाऱ्यांचीच फिरकी घेतली. त्यातच महागाव पोलिसांनीही या बियाणे विक्रेत्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितल्याने कारवाईसाठी गेलेल्या कृषी अधिकाऱ्यांना आणखीणच हुडहुडी भरली. कारण या विक्रेत्याचा भाऊ महागाव पोलिसांच्या रेकॉर्डवर हिस्ट्रीशिटर म्हणून नोंद आहे. भक्कम पुरावे आणि कायदेशीर तरतूद असेल तरच कारवाईची भूमिका घ्या असा सल्ला पोलिसांनी दिला. मात्र प्रत्यक्षात कारवाईचा मार्ग सापडत नसल्याने आणि कारवाई केल्यास ती आपल्यावरच उलटण्याची चिन्हे पाहता अखेर या पथकानेही त्या बियाणे विक्रेत्याचा माग सोडून परत येणे पसंत केले. संपूर्ण दिवस महागावात घालवूनही या पथकाला कारवाई करणे शक्य झाले नाही. या पथकाला एवढ्या वर्षात पहिल्यांदाच हा मास्टर मार्इंड बियाणे विक्रेता मिळाला असावा. (जिल्हा प्रतिनिधी)