शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन खरेदीचे तार पुसदमध्ये

By admin | Updated: June 13, 2014 00:38 IST

शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापाऱ्याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

पुुसद : शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रुपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापाऱ्याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे. तो व्यापारी कोण, रक्कम कोणाच्या खात्यात जमा केली आणि बँकेच्या वेअर हाऊसमधून सोयाबीन पुसदला आले कसे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस तपास या सर्व बाबीवर केंद्रीत झाला असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

मानोरा तालुक्यातील व्यापारी अशोक मंत्री याने ४७ शेतकऱ्यांकडून आठ हजार ४०० पोते सोयाबीन खरेदी केले होते. त्याची रक्कम एक कोटी चार लाख रुपये आहे. हा माल बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊसमध्ये ठेवून तारण कर्ज एक कोटी २६ लाख रुपये घेऊन व्यापारी अशोक मंत्री पसार झाला होता. विशेष म्हणजे अशोक मंत्री याचा भाऊ सुरेशने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार मानोरा पोलीस ठाण्यात दिली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.

आपल्या मालाचे पैसे मिळतील की नाही, या विवंचणेत शेतकरी असताना काही जण त्यांना कोरडे आश्वासन देत होते. मात्र कोंडूली येथील शेतकरी विजय नानासाहेब देशमुख यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर मानोरा पोलिसांनी व्यापारी अशोक मंत्रीविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली. सध्या मंत्री हा न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणातील त्याचे तीन साथीदार मात्र फरार असल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. या बहुचर्चित प्रकरणात शेतकऱ्यांची फसवणूक करून हजारो क्विंटल सोयाबीन बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊसमधून पुुसद येथे आणून विकण्यात आला. या मालाची रक्कम पुसदच्या त्या व्यापाऱ्याने बँकेत जमा केली. ही रक्कम कोणाच्या बँक खात्यात जमा केली, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. मंगरुळपीर येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊसमध्ये ठेवलेले सोयाबीन पुसदला आले कसे, या कामी कोणी मदत केली, यात बँकेचा अधिकारी तर गुंतला नाही ना, पुसदला हा माल कोणी विकला, हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी करणारा पुसदचा तो व्यापारी कोण, असे अनेक प्रश्न आता पुढे आले आहे. विशेष म्हणजे वेअर हाऊसमधले सोयाबीन विकण्यामध्ये अनेक जण सहभागी असल्याची शक्यता असून यामध्ये अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)