आर्थिक संकट : मदतीसाठी निवेदन सादरकळंब : पावसाने ऐनवेळी दडी मारल्याने सोयाबीन पीक हातचे गेले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडून सोयाबीन पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली. यासाठी तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले. सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आॅगस्ट महिना संपूर्ण आणि सप्टेंबरचा एक आठवडा पाण्याने दडी मारली. तेव्हा सोयाबीन पीक फुलावर होते. या काळात पाण्याची अतिशय आवश्यकता होती. परंतु ऐनवेळेवरच पाण्याचे चाट दिली. त्यामुळे चांगले आलेले सोयाबीनचे पीक पुरते वाया गेले. त्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर वसंत होले, संगीता काळे, सुनील फाळे, शेख खासीम, शेख आसीफ, शेख मस्तान, मनोहर काळे, बाबाराव येंडे, त्र्यंबक ओंकार, अविनाश धोबे, रवींद्र ओंकार, पुष्पा ओंकार, शालीक होले, बळवंत होले, मीरा चव्हाण, नारायण गोरे, माधव पोकळे, रमेश भिसे, अनुसया बोबडे, अनिल काकडे, उमेश भिसे, सुधाकर मडावी, मोरेश्वर नेवारे, गणेश शिंदे, संतोष शिंदे, वैशाली शिंदे, आरती देवकते, विठाबाई नेहारे, दिगांबर चौधरी, अशोक चवरडोल, विजय नेहारे, देवेंद्र ओंकार, श्रीधर बरडे, विलास बोबडे, दिनेश काळे, प्रमोद नवाडे, नारायण गवळी, अर्चना धोबे, चिंतामण सुरदुसे, निरंजन बोभाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
कळंब तालुक्यात सोयाबीनने दिला दगा
By admin | Updated: September 26, 2016 02:39 IST